kartik aaryan watch gadar 2 in mahim gaiety galaxy and enjoy sunny deol handpump scene tara singh  SAKAL
मनोरंजन

Kartik Aaryan Gadar 2: तारा सिंगचा हँडपंप सीन येताच कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये केला जल्लोष, व्हिडीओ व्हायरल

कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये गदर 2 पाहत एकच जल्लोष केलाय. व्हिडीओ व्हायरल झालाय

Devendra Jadhav

Kartik Aaryan on Gadar 2: सनी देओलचा गदर 2 बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजतोय. सनी देओल आणि त्याने साकारलेल्या तारा सिंग या व्यक्तिरेखेची जादू २२ वर्षांनंतरही कायम आहे हे सिद्ध झालंय. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील तमाम प्रेक्षक गदर 2 बघायला थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सुद्धा गदर 2 तोंडभरुन कौतुक केलंय. अशातच तरुणींच्या गळ्यातला ताईत असलेला कार्तिक आर्यनने थिएटरमध्ये गदर 2 पाहत एकच जल्लोष केलाय.

(kartik aaryan watch gadar 2 in mahim gaiety galaxy)

कार्तिक आर्यनने पाहिला गदर 2 आणि थिएटरमध्ये केला राडा

कार्तिक आर्यनने १५ ऑगस्टला माहीमच्या गेटी गॅलेक्सी येथे प्रेक्षकांसोबत सनी देओलचा गदर 2 पाहिला आणि तो थक्क झाला. कार्तिक आर्यन सनी देओलचा चाहता झाला असून, तो त्याचे कौतुक करताना थकत नाही. अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'गदर 2' मधील हँडपंप दृश्याची व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली आहे.

'गदर 2' पाहिल्यानंतर कार्तिक आर्यन सनी देओलचा चाहता झाला. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'गदर 2' चा हँडपंप सीन शेअर केला आणि लिहिले, 'हा सीन आयकॉनिक आहे. माझ्या आतला फॅन बॉय तारा सिंग सनी देओलसाठी ओरडतोय.

स्वातंत्र्यदिनी गदर 2 ची रेकॉर्डब्रेक कमाई

गदर 2 ने रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी रेकॉर्डब्रेक कमाई करत पुन्हा एकदा रेकॉर्ड केला आहे. भारत पाकिस्तानातील प्रेमकहानीवर आधारित हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी झाली होती.


गदर 2 ने रिलीजच्या पाचव्या दिवशी सगळ्या जास्त कोटींचा गल्ला जमावला आहे. सनी देओलच्या गदर 2 ने रिलिजच्या 5 व्या दिवशी 55.5 कोटींची कमाई केली. याच आकड्यावरुन आता गदर 2 च्या एकूण कमाईबद्दल बोलायचं झालं तर, चित्रपटाने जगभरात आत्तापर्यंत 230 कोटींचा गल्ला जमावला आहे.


जिकडे तिकडे एकच नारा.. तारा सिंग

बॉलीवूडमधील टॉप 5 सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत गदर 2 आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. चित्रपटाची कमाई आणि चाहत्यांचे प्रेम पाहून सनी देओल आणि निर्माते खूश आहेत.(Latest Marathi News)

अनिल शर्मा यांनी गदर 2 चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सनी देओल आणि अमिषा पटेलसोबत उत्कर्ष शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. उत्कर्षने गदर २ मध्ये सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारली आहे. सिमरत कौरने देखील चित्रपटात महत्वाची भुमिका साकारली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT