SatyaPrem Ki Katha Gujju Pataka Song  Esakal
मनोरंजन

SatyaPrem Ki Katha: चित्रपट हिट करण्यासाठी आता कार्तिकनंही घातली लुंगी! 'गुज्जु पटाका' गाणं रिलिज...

Vaishali Patil

Gujju Pataka Song : अभिनेता कार्तिक आर्यनच्या 'सत्यप्रेम की कथा'या चित्रपटाची सध्या चर्चा सुरु आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भुमिका असलेला हा चित्रपट काही दिवसात चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी निर्माते खूप मेहनत घेत आहेत.

या चित्रपटाचे पहिले गाणे 'तू मेरी रहना' काही दिवसापुर्वी प्रदर्शित झालं जे प्रेक्षकांना चांगलच आवडलं, त्यानंतर आता चित्रपटाचे दुसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

आता या चित्रपटाचा 'गुज्जू पटाका' हे नवं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात कार्तिक आर्यन नवरदेवाच्या रुपात दिसत आहे. या गाण्यात तो साउथ लूकमध्येही दिसत आहे. लुंगी घालुन त्याने जोरदार डान्सही केली आहे. त्याचबरोबर नंतर तो गुजराती लुकमध्येही दिसत आहे. त्याचबरोबर गाण्यात अनेक संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या गाण्यात कार्तिक आर्यन जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. गाण्यात एक सीन देखील येतो, ज्यामध्ये कार्तिकशी लग्न करण्यासाठी मुली आपापसात भांडत आहे.

हे गाण रिलिज होताच ट्रेंडही होत आहे. सर्वांनी पुन्हा कार्तिकच्या डान्सच खुप कौतुक केले आहे. तर काहींनी कार्तिकनंही लुंगी घातली असं म्हणत त्याची खिल्लीही उडवली आहे. तर काही त्याचं कौतुक करतांना थकत नाही आहे. मात्र या गाण्यानंतर पुन्हा कार्तिकनं लाईमलाईट चोरली आहे हे मात्र नक्कीच

सत्यप्रेम की कथाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे तर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी त्यांच्याशिवाय गजराज राव, सुप्रिया पाठक, रितू शिवपुरी आणि माहरु शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सत्यप्रेम की कथा एनजीई आणि नमह पिक्चर्स यांनी संयुक्तपणे निर्मित केली आहे. विशेष म्हणजे, किशोर अरोरा आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्यासह साजिद नाडियादवाला आणि शरीन मंत्री केडिया यांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. 'सत्यप्रेम की कथा' 29 जून 2023 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दरवर्षी बाळंतपण! वंशाला हवेत दोन दिवे; पाचव्यानंतर सहावं पोटात, डॉक्टरने पती-पत्नीला झापझाप झापलं; व्हिडीओ व्हायरल

'सुनेला सासरी जुळवून घे...' म्हणणं क्रूरता नाही; सुप्रीम कोर्टाचे मोठे निरीक्षण, वैवाहिक वादांत कायद्याचा गैरवापर टाळा

IPL 2026: Mumbai Indians च्या अपयशानंतर हार्दिक पांड्यानं उचललं मोठं पाऊल; जगभरातील चाहत्यांना बसला धक्का, नेमकं काय केलं?

Metro Lines 5A and 12A: कल्याण-नवी मुंबई प्रवास आणखी सोपा होणार! MMRDA नवे मेट्रो नेटवर्क उभारणार; मार्ग कसा असणार?

Pune Car Accident : पुण्यात पुन्हा 'ड्रिंक अँड ड्राईव्ह'चा थरार; दारूच्या नशेत 19 वर्षीय तरुणाने भरधाव चालवली कार, गाडी थेट गरवारे पुलावरून कोसळली खाली

SCROLL FOR NEXT