Kashmera Shaha esakal
मनोरंजन

Kashmera Shaha: 'तू तर रानू मंडलपेक्षाही...' कश्मिराचा 'विना मेकअप' फोटो

कश्मिरा ही तिच्या अभिनयासाठी नाही तर दिसण्यामुळे जास्त चाहत्यांच्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kashmera Shah New Look: कश्मिरा ही तिच्या अभिनयासाठी नाही तर दिसण्यामुळे जास्त चाहत्यांच्या चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. कायम आपल्या बोल्डनेसमुळे न्युजमध्ये राहणाऱ्या कश्मिराचा लूक हा चाहत्यांना अनेकदा घायाळ करत असतो. आता मात्र ज्या लूकनं कश्मिरा चाहत्यांना घायाळ करत होती तोच लूक विनामेक अप व्हायरल झाला आहे. त्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन तिला वाट्टेल त्या कमेंटही केल्या आहेत.

यापूर्वी देखील वेगवेगळ्या कारणामुळे कश्मिरा चर्चेत आली होती. ती तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. आतापर्यत बॉलीवूडच्या निवडक चित्रपटांमध्ये दिसलेली कश्मिरा ही फिटनेस फ्रीक म्हणूनही ओळखली जाते. तिचा नवा लूक व्हायरल झाल्यानंतर तिच्यावरुन नको त्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. तिचा तो लूक पाहिल्यानंतर एखाद्या बॉलीवूड स्टार्ससाठी मेकअप किती महत्त्वाचा असतो दिसून येते. विना मेकअप त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ जर चाहत्यांनी पाहिले तर त्यावर त्यांची परखड प्रतिक्रिया ठरलेली असते.

कश्मिराच्या बाबत असेच झाले. त्यामुळे तिला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं आहे. कश्मिरानं एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती मेकअप करताना दिसत आहे. या मध्ये कश्मिराने तिचा मेकअप रूटींग काय आहे हे सर्वांना सांगितले आणि सुरूवातीला ती विना मेकअप दिसली. कश्मिराने इन्स्टा लाइव्ह केले पण तिला हे मेकअप लाईव्ह चांगलेच महागात पडल्याचे दिसून आले आहे.

कश्मिरा शाहचा नो मेकअप लूक पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. एकाने लिहिले, अशा रुपात जर तुला कृष्णानं पाहिलं तर तो देखील घाबरुन जाईल. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, तू तर आता राणु मंडलपेक्षाही भयानक दिसू लागली आहेस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT