The Kashmir Files esakal
मनोरंजन

भाजपशासित 8 राज्यांत 'काश्मीर फाईल्स' TAX FREE

काश्मीर फाईल्स या चित्रपटाची सध्या देशात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.

सुधीर काकडे

Kashmir Files TAX FREE : काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांर आधारीत काश्मीर फाईल्स हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या या चित्रपटात नव्वदच्या दशकात काश्मिरी पंडितांवर (Kashmiri Pandit) झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम करण्यात आल्याच्या भावना प्रेक्षकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तर काही लोकांनी हा चित्रपट भावना भडकावणारा असल्याचं म्हटलं आहे. याच दरम्यान, देशातील अनेक राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

काश्मीर फाईल्स हा चित्रपटानं प्रदर्शित झाल्यापासूनच तो चर्चेचं कारण ठरला आहे. चित्रपटाचा विषय, त्यामधील कलाकार आणि अनेक चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया अशा अनेक गोष्टींमुळे चित्रपट चर्चेत आहेत. या चित्रपटाचं भाजप नेत्यांनीही मोठ्या प्रमाणात कौतूक केलं असून, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या चित्रपटाचं कौतूक केलंय. दरम्यान, भाजप शासित ८ राज्यांत आतापर्यंत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.

काश्मीर फाईल्स हा चित्रपट गुजरातमध्ये सर्वात आधी टॅक्स फ्री करण्यात आला. त्यानंतर उत्तरेकडील बहुतांश राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याचा निर्णय़ घेतला. महाराष्ट्रात देखील भाजप नेत्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली. त्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील गदारोळ झाला. काश्मीर फाईल्स सिनेमा संपल्यानंतर काही लोक हिंदूंना गोळा करून भाषण करतात, असं वक्तव्य गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले होते. यावर भाजप नेते अतुल भातकळकर यांनी ट्वीट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय. “काश्मीर फाईल्स सिनेमा संपल्यानंतर काही लोक हिंदूंना गोळा करून भाषण करतात, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत म्हणाले. शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, पण महाराष्ट्रात हिंदूंना एकत्र करण्याची चोरी झाली आहे.” असं त्यांनी म्हटलं होतं.

कोणत्या राज्यांत काश्मीर फाईल्स टॅक्स फ्री...

गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि त्रिपुरा या ८ राज्यांत हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहेत. यामध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सत्ता आलेल्या ३ राज्यांचा समावेश आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये देखील भाजपची सत्ता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'बागेश्वर धाम'मध्ये मोठी दुर्घटना! मंडप कोसळल्याने भाविकाचा मृत्यू, 10 जण जखमी; धीरेंद्र शास्त्रींच्या वाढदिवसाला आले होते लोक

Latest Maharashtra News Updates : अमरावतीत उड्डाणपुलावर भीषण अपघात; टँकरच्या धडकेत महिलेने गमवावा जीव

Hotel Bhagyashree: आता हे काय? "अबकी बार तुळजापूर विधानसभा करणार पार …"; हॉटेल भाग्यश्रीचा मालक आमदार होणार?

High Court : अवैध बांधकामासाठी ठोठावलेला दंड जमा; न्यायालयात याचिकाकर्त्याची माहिती, निधीचा वापर पशू कल्याण, आरोग्यासाठी

Ashadhi Wari 2025: 'तृतीयपंथीची जोगव्यातून वारकऱ्यांची सेवा'; पळशीतील रवी ऊर्फ सरस्वती यांचे अनोखे दातृत्व; झुणका भाकरीचा खास बेत

SCROLL FOR NEXT