katappas daughter said dont teach what to wear gives a befitting reply to Uttarakhand cm tirath Singh Rawat 
मनोरंजन

'आम्ही काय नेसायचं हे तुम्ही सांगू नका' कटाप्पाची मुलगी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांवर भडकली

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कोणी काय परिधान करावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी अशावेळी काही सामाजिक संकेत लक्षात घ्यावे लागतात. याचा मात्र कोणीही गांभीर्यानं विचार करत नाही. दोन दिवसांपूर्वी फाटलेली जीन्स घातली यावरुन उत्तराखंडच्या मुख्यंमंत्री तीरथ सिंह यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यावरुन नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. त्या वादात अनेक सेलिब्रेटींनी उडी घेतली आहे. तीरथ सिंह यांच्या वक्तव्याचा निषेध त्यांनी केला आहे. अभिनेत्री गुल पनाग, शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनीही अशाप्रकारच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आता त्यात आणखी एका नव्या प्रसिध्द सेलिब्रेटीच्या मुलीची भर पडल्यानं तो वाद पुन्हा चिघळल्याचे दिसून आले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी असे म्हटले होते की, रिप्ड जीन्स हे आपल्या समाज विभागण्याचे आणि बिघडण्याचे एक उदाहरण म्हणावे लागेल. त्यावर बाहुबलीमध्ये कटाप्पाची भूमिका साकारणा-या सत्यराजची मुलगी दिव्यानंही मुख्यमंत्र्यांच्या विधानावर टीका केली आहे. त्यापूर्वी अमिताभ यांची नात नव्या नवेली नंदानेही मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय बरोबरच एक सांस्कृतिक वळण लागल्याचेही दिसून आले आहे. सोशल मीडियावर दिव्याची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. त्यालाही अनेकांनी ट्रोल केले आहे तर काहींनी तिच्या त्या भूमिकेचं कौतूकही केलं आहे.

दिव्यानं उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना असा सल्ला दिला आहे की, त्यांनी महिलांना काही शिकवण्याची गरज नाहीये. त्यांनी कुठले कपडे परिधान करावेत हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करु नये. मिस्टर तीरथ  सिंह आम्ही काय परिधान करावे हे तुम्ही आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. मी तर माझी फाटलेलीच जीन्स घालणार आहे. असे म्हणून दिव्यानं त्यासोबत एक फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोंच्या माध्यमातून तिनं असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, महिलांना त्यांच्या वेशभुषेवरुन ओळखले जाऊ नये. 

त्याचे झाले असे की, सीएम तीरथ सिंह हे एका कार्यक्रमात बोलताना गंभीर स्वरुपाचे विधान केले होते. त्या कार्यक्रमामध्ये सिंह हे अध्यक्ष होते. ते म्हणाले होते की, आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालताना दिसत आहेत. त्यावेळी त्यांचे गुडघे दिसतात. याला काय संस्कार म्हणायचे काय़, आणि ते कोठून येत आहेत. यातून मुले काय शिकणार, आणि महिला समाजाला काय संदेश देणार हा प्रश्न आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT