Merry Christmas Release Date Out Katrina Kaif Esakal
मनोरंजन

Merry Christmas: कतरिनाना झाला मोठा आनंद, गोड बातमी सगळीकडं सांगत सुटलीये!

Vaishali Patil

Merry Christmas Release Date Out Katrina Kaif: बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री कतरिना कैफने काल तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला खास बनवण्यासाठी ती नुकतीच तिचा पती आणि अभिनेता विकी कौशलसोबत सुट्टीसाठी निघाली. कतरिनाच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक कलाकारांनीही तिला वाढदिवशी शुभेच्छा दिल्या.

तर विकी कौशलने सोशल मीडियावर तिच्या व्हेकेशनचे काही रोमँटिक फोटो शेअर करून कतरिनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता मात्र कतरिनाने तिच्या चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिलं आहे. तिने तिच्या आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट चाहत्यांसोबत शेयर केली आहे.

कतरिना कैफ आणि विजय सेतुपती यांनी 'मेरी ख्रिसमस' या थ्रिलर चित्रपटामध्ये पहिल्यांदा एकत्र काम करत आहे. हा चित्रपट डिसेंबर 2022 मध्ये प्रदर्शित होणार होता, परंतु तो अनेक वेळा पुढे ढकलला गेला. अखेर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'मेरी ख्रिसमस'ची अधिकृत रिलीज डेट प्रेक्षकांना सांगतिली आहे.

कतरिनाने चित्रपटाचा फर्स्ट लुकसह शेयर करत 'मेरी ख्रिसमस' रिलीज तारीख चाहत्यांना सांगतिली आहे. कतरिना कैफ आणि विजय सेतुपती याचा 'मेरी ख्रिसमस' 15 डिसेंबर 2023 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमिळमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विशेष म्हणजे 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट वेगळ्या सपोर्टिंग कास्टसह दोन भाषांमध्ये शूट केला आहे. हिंदी भाषेत संजय कपूर, विनय पाठक, प्रतिमा कन्नन आणि टिनू आनंद यांनी अभिनय केला आहे तर तमिळ भाषेत राधिका सरथकुमार, शनमुगराजा, केविन जय बाबू आणि राजेश विलियम्स यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

रमेश तौरानी आणि जया तौरानी यांच्या 'मेरी ख्रिसमस' मध्ये संजय राउत्रे आणि केवल गर्ग यांनीही सहकार्य केले आहे. हा चित्रपट टिप्स फिल्म्स आणि मॅचबॉक्स पिक्चर्स या प्रॉडक्शन हाऊसने तयार केला आहे.

कतरिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर 'मेरी ख्रिसमस' सोबतच कतरिना कैफ लवकरच सलमान खानसोबत 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : ''परधर्मातील मुलासोबत पळून जाणाऱ्या मुलींचे हातपाय तोडा'', भाजपच्या माजी खासदाराचं वादग्रस्त विधान!

IND vs AUS 1st ODI Live: टीम इंडियाला अक्षर पटेल, लोकेश राहुलने दिला आधार; २६ षटकांच्या सामन्यांत ऑसींसमोर 'इतके' लक्ष्य

Crime: लग्नाच्या ११ दिवसांनी १६ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिला, नंतर १९ व्या दिवशी पतीला अटक अन्...; घटना वाचून डोकं चक्रावेल

Nashik News : दत्त मंदिराची त्वरित पुनर्स्थापना करा; हिंदू एकता आंदोलन आणि काँग्रेस पक्षाचा प्रशासनाला इशारा

Latest Marathi News Live Update : बदलापुरात 17 हजार बोगस मतदार

SCROLL FOR NEXT