Katrina Kaif, Vicky Kaushal
Katrina Kaif, Vicky Kaushal Google
मनोरंजन

कतरिना-विकीच्या गोड नात्यात अवघड क्षण; अभिनेत्री झाली भावनिक

प्रणाली मोरे

नुकताच 'व्हॅलेंटाईन डे'(Valentine Day) जगभरात साजरा केला गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेकांनी वेळात वेळ काढून या दिवसाला आपापल्या बजेटप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा केला. या दिवशी सगळ्यात प्रामुख्यानं सर्वांचं लक्ष असतं ते बॉलीवूडमधले कपल्स हा दिवस कसा साजरा करतात याकडे. यंदा 'न्यूली मॅरिड कपल्स'ची एंटरटेनमेंट इंडस्ट्री मध्ये मोठी संख्या होती. म्हणजे गेल्या वर्षाच्या शेवटाला अनेकजणांनी लग्नगाठ बांधली. त्यात आपली लाडकी कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky Kaushal) हे बॉलीवूड मधल्या (Bollywood) मोस्ट लव्हेबल कपलकडून सगळ्यांच्या खूप अपेक्षा होत्या या सेलिब्रेशनविषयी. म्हणजे विकी-कतरिना हा दिवस मोठ्या दणक्यात साजरा करतील वगेैरे,वगैरे...

पण कतरिना-विकीनं असं काहीही केलेलं नाही. खरंतर यांच्या लग्नानंतर हे दोघे जरा जास्तच कामात बिझी आहेत. विकी आपल्या सिनेमाचं शूटिंग भारतात करीत आहे तर कतरिना आपल्या सिनेमाच्या शूटिंगसाठी परदेशात होती. पण हे लव्हबर्ड्स 'व्हॅलेंटाईन डे' च्या प्रहरी मुंबईत परतले तेव्हा चाहत्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर मात्र या चाहत्यांच्या हाती निराश लागल्याची बातमी व्हॅलेंटाईनच्या रात्री अचानक मिळाली. आता काय झालं आहे नेमकं? कतरिना-विकीनं असं काय केलं की त्यांच्या 'व्हॅलेंटाईन डे' विषयी चाहत्यांनी मनात रेखाटलेलं चित्र पुसलं गेलं आहे.

तर बातमी आहे की कतरिना-विकी मुंबईत परतले आहेत. पण त्यांनी काल व्हॅलेंटाईन सेलिब्रेशन केलेलं नाही. ते दोघेही कुठल्याशा शूटिंगमध्ये बिझी होते. कतरिनानं काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यात विकी-कतरिना अगदी साध्या पेहरावात दिसत आहेत. आजुबाजूला कुठलंही रोमॅंटिक डेट चं वातावरण नाही, तर शूटिंगच्या लाईट्स सेट केलेल्या दिसत आहेत. आता यावरुन कळतंय बिचाऱ्यांचा व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट झालाच नाहीय. पण त्यातही ही गोष्ट सुखावह आहे की दोघे एकत्र आहेत,एकमेकांच्या मिठीत निवांत आहेत आणि सुखाचे ते चार क्षण उपभोगत आहेत. स्वतः कतरिनानं हे रोमॅंटिक फोटो पोस्ट करीत म्हटलंय की,''यंदाचा व्हॅलेंटाईन डे आपण सेलिब्रेट नाही करू शकलो. पण या कठीण क्षणातही आपण एकत्र आहोत,वेळ घालवत आहोत आणि जे क्षण मिळाले आहेत ते एकत्र एन्जॉय करीत आहोत''. आता खरंच लग्नानंतरचा पहिला व्हॅलेंटाईन सेलिब्रेट नाही करता आला हे त्यांच्यासाठी अवघड बनलंय नाही का...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT