Katrina Kaif Latest News Katrina Kaif Latest News
मनोरंजन

Katrina Kaif : कतरिनाने सांगितले लग्न होईपर्यंत का होती गप्प; म्हणाली...

आम्ही दोघे खूप आनंदी आहोत

सकाळ डिजिटल टीम

Katrina Kaif Latest News कतरिना कैफ आणि विक्की कौशल (Vicky Kaushal) यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये राजस्थानमधील रिसॉर्टमध्ये लग्न केले होते. सर्व काही लीक झाले असले तरी लग्नाची बातमी मीडियासमोर येऊ नये यासाठी दोघांनी पुरेपूर प्रयत्न केले होते. लग्नापर्यंत दोघांनी मीडियाला काहीही सांगितले नाही. नंतर लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. लग्न इतके गुप्त ठेवल्याने अनेक मीम्सही बनवण्यात आले. आता कतरिना कैफने (Katrina Kaif) लग्न होईपर्यंत गप्प का होते, हे सांगितले.

विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) मंगळवारी फिल्मफेअर अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर होते. दोघे अनेक पाहुण्यांमध्ये एकत्र बसलेले दिसले. सरदार उधम सिंगसाठी विक्कीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तेव्हा कतरिनाने त्याच्या गालावर चुंबन घेतले.

कतरिनाला विचारले की, तिने गुपचूप लग्न का केले. तेव्हा तिने सांगितले, मला वाटते लग्न खाजगी ठेवण्यापेक्षा कोरोना निर्बंधांमुळे असे करावे लागले. माझ्या कुटुंबातील सदस्यांनाही कोरोना झाला होता. त्यामुळे आम्हाला ते गांभीर्याने घ्यावे लागले.

हे वर्ष खूप चांगले गेले आहे. परंतु, कोरोनामुळे आम्हाला थोडे अधिक सावध व्हायचे होते. लग्न छान पार पडलं. आम्ही दोघे खूप आनंदी आहोत, असेही कतरिनाने सांगितले. कतरिना हॉरर कॉमेडी फोन-भूतमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. कतरिनाने सलमान खानसोबत टायगरच्या तिसऱ्या भागाचे काम पूर्ण केले आहे. मेरी ख्रिसमसमध्ये कतरिना तमिळ स्टार विजय सेतुपतीसोबत काम करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT