Katrina Kaif Google
मनोरंजन

लग्नमंडपात गुलाबी रंगाच्या लेहंग्यामध्ये दिसली नववधू कतरिना...

'सब्यासाची' ने डिझाईन केलेल्या पेहरावातला लूक अखेर समोर आला...

प्रणाली मोरे

ज्या लग्नानं गेले काही महिने वर्तमानपत्र,दृकश्राव्य माध्यम ते सोशल मीडियापर्यंत सगळ्याच माध्यमांवर कब्जा केला होता ते अखेर आज राजस्थानमधील ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या साक्षीनं पार पडलं म्हणायचं. कतरिना कैफ(Katrina Kaif) आणि विकी कौशल(Vicky Kaushal) हे बॉलीवूडचे दोन नामवंत कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले एकदाचे. त्यांनी आपल्या लग्नावर काहीही भाष्य केलं नसलं तरी लग्नाची बित्तंबातमी समोर आलीच. इतकंच काय लग्नामध्ये आलेल्या पाहुण्यांपासून सगळ्यांनाच फोन वापरण्यावर बंदी करूनही कतरिनाचा लूक समोर आलाच म्हणायचा.

सूत्रांच्या माहितीनुसार कतरिनाने 'सब्यासाची'नं डिझाईन केलेला गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केल्याचं कळतंय. वर-वधूची मंडपातील एंट्रीही खूप झकास झाली असं म्हटलं जातंय. कतरिनाला ज्या डोलीमधनं मंडपापर्यंत आणलं गेलं ती डोली भरगच्च रंगबिरंगी फुलांनी सजवली होती अशीही माहिती समोर येतेय. तर किल्ल्यातला जो 'शीश महल' हा महत्त्वाचा आणि सर्वात आकर्षक असा दर्शनीय भाग असतो तिथे लग्नाचा मंडप बांधण्यात आला होता. आणि याच देखण्या मंडपात आरपसपानी सौंदर्याची कतरिना अखेर मिसेस.विकी-कौशल झाली.

गेल्या काही वर्षांत अनुष्का,दिपिका,प्रियंका अशा बड्या अभिनेत्रींनी लग्न केलं. त्यावेळी त्यांनी लग्नात घातलेला लेहंगा हे मुख्य आकर्षण होतं. या प्रत्येकीची लग्नाच्या त्या खास लेहंग्यासाठी चॉईस होती ती 'सब्यासाची' कलेक्शनलाच. आता कतरिनानंही त्याच 'सब्यासाची' वेडिंग कलेक्शनचा खास गुलाबी रंगाचा लेहंगा आपल्या लग्नात घातला त्यामुळे अर्थात तिचंही रुप खुलून आलं असणार हे नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

CA Result Success Story: रोज आठ ते दहा अभ्यासात जीव ओतून जिद्द व चिकाटीच्या जोरावर गेवराईच्या पृथ्वीराजचे 'सीए'परीक्षेत यश

SCROLL FOR NEXT