Katrina Kaif, Vicky Kaushal,Suzanne Turquotte Google
मनोरंजन

कतरिनाची आई मुंबईत दाखल;लगीनघाईची लगबग!

शॉपिग करताना दिसून आल्यामुळे लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब...

प्रणाली मोरे

गेल्या अनेक दिवसांपासून विकी कौशल आणि कतरिना कैफच्या लग्नाच्या चर्चेनं जोर धरलाय. पुढच्या डिसेंबर महिन्यात कतरिना मिसेस.कौशल होणार यावर जवळ-जवळ सर्वांचं एकमत झालेलं असलं तरी ह्या दोघांनी मात्र चुप्पी साधलीय. दोन दिवसांपूर्वी विकीच्या चुलत बहिणीनं या बातम्या अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण तितक्यातच आज एक अशी गोष्ट समोर आली की पुन्हा विकी-कतरिना लग्न करणार असल्याच्या बातमीवर जोरदार चर्चा सुरू झाली.

विकी-कतरीनाचं लग्न राजस्थानमध्ये एका लक्झुरियस रीसॉर्टमध्ये होणार आहे. पाहुण्यांची लिस्टही फायनल झाली असून लग्नासाठी येणा-या पाहुण्यांना काही अटीही घालण्यात आल्या आहेत. विकी-कतरीनानं येणा-या पाहुण्यांना सोबत फोन आणण्यास नकार दिलाय या बातमीनंही मध्यंतरी डोकं वर काढलं होतं. इतकंच काय कतरिना कुठला लेहंगा घालणार आणि किती लाखांची मेहेंदी काढणार हेही लोकांना कळलं पण तरीही काही केल्या कतरीना-विकी काही बोलत नसल्याने विश्वास डळमळत होता की या बातमीत किती तथ्य आहे ते. पण आज कतरीनाच्या आईला मुंबईत शॉपिंग करताना पाहिलं गेलं आणि पुन्हा ही बातमी खरी आहे यावर चर्चा सुरू झाली.

मुंबईमध्ये कतरिनाची आई एका मोठ्या शॉपमधनं बाहेर पडत होती तेव्हा तिला कॅमे-याने टिपलं आणि ही खबर वा-्यासाारखी पसरली. गाडीत बसताना तिचा मोबाईल जमिनीवर पडला पण तिने तो घाई-घाईने उचलला आणि गाडीत बसून निघून गेली. पण चर्चा तर रंगली की कतरिनाच्या लग्नासाठीच तिची आई मुंबईत दाखल झालीय आणि शॉपिंगची लगीनघाईही तिची सुरू आहे. कतरिनाच्या आईचा मुंबईतील दुकानाच्या बाहेरचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होतोय.

त्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. कोणी म्हणतंय,'अरे तो फोन उचला पटकन. त्याच्यातच कतरिना-विकीच्या लग्नाच्या बातम्या लपलेल्या आहेत'. 'लग्नाचा पत्ता आणि गरजेचे नंबर सापडतील बघा', अशी ही कमेंट केलेली आहे. काहीही असो, कतरिनाच्या आईचं शॉपिंग करताना दर्शन झाल्याने आता पुन्हा कतरिना-विकीच्या लग्नाच्या बातम्यांचा जोर वाढलाय म्हणायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आठव्या वेतन आयोगानुसार किमान 'इतका' असेल पगार, आकडा आला समोर

IND vs NZ 3rd T20I : भारताने जिंकली सलग नववी ट्वेंटी-२० मालिका! अभिषेक, सूर्यकुमारच्या वादळासमोर न्यूझीलंडचा पालापाचोळा

Accident News: भीषण अपघात! महामार्गावर दोन बसची समोरासमोर टक्कर; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

Indian Video : भारताला स्वातंत्र्य 99 वर्षांच्या करारावर मिळालंय? 2046 मध्ये इंग्रज परत येणार? वादग्रस्त व्हिडिओतील वक्तव्य कितपत खरं

Latest Marathi news Update : देश-विदेशातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT