मनोरंजन

KBC 13: जिंकलेल्या रकमेचं काय करणार? कोट्यधीश हिमानीचं उत्तर

दिव्यांग शिक्षिका हिमानी ठरल्या या सिझनच्या पहिल्या कोट्यधीश

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो कौन बनेग करोडपतीमध्ये (Kaun Banega Crorepati) येणाऱ्या स्पर्धकांची अनेक स्वप्नं असतात. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी ते शोमध्ये सहभागी होतात. या शोचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचे मनोबल वाढवतात. सध्या या शोमध्ये आलेल्या दिव्यांग शिक्षिका हिमानी बुंदेला यांची चर्चा सुरू आहे. त्या या केबीसी-13 च्या पहिल्या करोडपती स्पर्धक आहेत. हिमानी या गणिताच्या शिक्षिका असून त्या प्राथमिक शाळेत शिकवतात. केबीसीमध्ये आता त्या सात कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. त्या सात कोटी रुपये जिंकणार का? याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. हिमानी यांनी जिंकलेल्या रक्कमेबद्दल एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

हिमानी बुंदेला यांना नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला की,"तुम्ही जिंकलेल्या रकमेचं काय करणार?" त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'मी या शोमधून जी रक्कम जिंकेल त्यामधून मी मला सर्वसमावेशक कोचिंग सुरू करणार आहे. आपल्याकडे सर्वसमावेशक विद्यापीठे आहेत, पण कोचिंग नाही. या कोचिंगमध्ये दिव्यांग आणि सामान्य विद्यार्थी एकत्र अभ्यास करतील. आम्ही या विद्यार्थींना UPSC आणि CPCS परीक्षांसाठी तयार करू. मला माझ्या वडिलांचा छोटा व्यवसाय उभा करायचा आहे जो लॉकडाऊन दरम्यान पूर्णपणे शून्यावर आला होता. मला तो व्यवसाय पुन्हा नव्याने सुरू करायचा आहे जेणेकरून त्यांचे भविष्य सुरक्षित होईल'

२०११ मध्ये हिमानी यांना अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांना त्यांची दृष्टी गमावली होती. मात्र असे होऊनही हिमानी यांनी हार मानली नाही. त्या मोठ्या जिद्दीनं आपल्या आयुष्याला सामोऱ्या गेल्या. अथक कष्टातून त्यांनी आपलं आयुष्य घडवलं. इतरांना प्रेरणा देणारं आयुष्य त्या जगल्या आहेत. त्याविषयी त्या एपिसोडमध्ये दाखवले जाणार आहे. आपल्या आतापर्यतच्या प्रवासाबद्दल हिमानी सांगतात की, सगळेच तर आपआपल्या पद्धतीनं जगत असतात. मात्र त्या जगण्याला काही अर्थ असावा. असं मला वाटतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Child Accident : पुण्यात भीषण अपघात! भरधाव कारने ६ दुचाकी, रिक्षाला उडवले; ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Akole Crime: अकोले तालुक्यात खळबळ! पाकिस्तानी ॲप कनेक्शनच्या संशयावरून चौकशी, एक चूक नडली अन् नेमकं काय घडलं..

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

विकीच्या वाढदिवसादिवशी कतरिनाने शेअर केला विहान फोटो, विकीला म्हणाली, 'तुला शांतपणे ब्लॅक कॉफी पिण्यासाठी...' Post Viral

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

SCROLL FOR NEXT