Kaun Banega Crorepati News Kaun Banega Crorepati News
मनोरंजन

KBC 14 : क्रिकेटशी संबंधित ‘या’ प्रश्नावर अडकल्या कविता; तुम्हाला माहितीये उत्तर?

शेवटच्या प्रश्नाचे उत्तर कविता चावलाकडे नव्हते

सकाळ डिजिटल टीम

Kaun Banega Crorepati News कौन बनेगा करोडपतीचा १४ वा सीझन (Kaun Banega Crorepati) प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. एकीकडे अमिताभ बच्चन शो मध्ये त्यांच्या आयुष्याशी निगडित किस्से सांगताहेत, तर दुसरीकडे प्रेक्षक स्पर्धक व प्रश्नांबद्दल उत्सुक असतात. दरम्यान, केबीसीमध्ये (KBC १४) पोहोचलेल्या कविता चावला यांनी एक कोटी जिंकून युजर्सना प्रभावित केले आहे. बारावी पास असलेल्या कविता यांना ७.५ कोटींसाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर माहीत नव्हते. तुम्हाला माहिती आहे का या प्रश्नाचे उत्तर?

कविता चावलाने केबीसी १४ मध्ये एक कोटी जिंकले. शोच्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी हा प्रश्न तब्बल ७.५ कोटींसाठी विचारला गेला होता. उत्तराची पूर्ण खात्री नसल्याने त्यांनी शो सोडण्याचा (क्विट) निर्णय घेतला. क्रिकेटमध्ये कोणताही रस नसल्याचे कविता यांनी शो सोडण्यापूर्वी सांगितले.

प्रथम श्रेणी पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय असलेल्या गुंडप्पा विश्वनाथ यांनी कोणत्या संघाविरुद्ध ही कामगिरी केली?

अ- सर्विसेस

ब - आंध्र

क - महाराष्ट्र

डी - सौराष्ट्र

(बरोबर उत्तर- आंध्र)

कोण आहे कविता चावला

केबीसी १४ मध्ये एक कोटी जिंकणारी कविता चावला या गृहिणी आहे. कविता यांनी सांगितले होते की, त्या २००० पासून केबीसीमध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, गेल्यावर्षी कविता हॉटसीटवर बसण्यापासून एक पाऊल मागे राहिल्या. त्यांनी ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’पर्यंतचा प्रवास केला होता. परंतु, यावेळी त्या केवळ हॉटसीटपर्यंतच पोहोचल्या नाही तर एक कोटीही जिंकले.

कविता फक्त बारावी पास

महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील रहिवासी असलेली कविता या केवळ बारावी पास आहे. कविता यांनी शोमध्ये सांगितले होते की, जिंकलेल्या १ कोटी रुपयांमध्ये मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवणार आहे. जर ७.५ कोटी रुपये जिंकले तर बंगला बांधेल व जगभर फिरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai : ईस्टर्न एक्सप्रेस वेवर डंपरची दुचाकीला धडक, घर बघायला गेलेल्या मामा भाच्याचा चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Summer Heatwave : राज्यात उन्हाच्या झळा तापदायक! सोलापूर, सांगलीत उष्ण; उकाडा कायम राहणार

Asha Bhosle : स्वरनक्षत्र निमाले! आशा भोसले यांचे निधन, मुंबईत आज अंत्यसंस्कार

Chhatrapati Sambhajinagar: नवीन जल योजना ; चार दिवसांच्या अथक परिश्रमानंतर मेनहोलचे काम पूर्ण; नक्षत्रवाडीत आज सायंकाळपर्यंत पाणी

Nashik IT Company Conversion Case: नाशिक धर्मांतर प्रकरणात खास मोड्यूल अन् फंडिंग? केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय चौकशी

SCROLL FOR NEXT