kavita kaushik 
मनोरंजन

कविता कौशिकला ट्रोलर्सकडून शिवीगाळ; स्क्रीनशॉट शेअर करताच मागितली माफी

स्वाती वेमूल

'एफआयआर' या मालिकेत चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कविता कौशिक हिला सोशल मीडियावर ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. कविताला मेसेजच्या माध्यमातून शिवागाळ केली जात होती. त्याचा स्क्रीनशॉट तिने ट्विटवर शेअर करताच संबंधित व्यक्तीने तिची माफी मागितली. काही युजर्सनी कवितासाठी सोशल मीडियावर अपशब्द वापरले. त्यानंतर कविताने त्या मेसेजचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर करत लिहिलं, 'या लोकांना समोर आणा, त्यांचा खुलासा करा.' या ट्विटमध्ये तिने मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सायबर सेल यांनासुद्धा टॅग केलं. कविताने स्क्रीनशॉट शेअर करताच संबंधित ट्रोलर्सनी तिची माफी मागितली. 

कविताची माफी मागत एका युजरने लिहिलं, 'मॅडम मला माफ करा. मी एक मुलगी आहे आणि माझे आईवडील खूप गरीब आबेत. कृपया मला माफ करा.' तर दुसऱ्या युजरने शाळेतील विद्यार्थी असल्याचं सांगत माफी मागितली. त्यावर कविता त्यांना म्हणाली, 'आज मी तुम्हाला माफ केलं तर उद्या तुम्ही लहान मुलांना शिवीगाळ कराल, मोठे झाल्यानंतर आजूबाजूच्या मुलींना शिवीगाळ कराल, आज जर तुम्ही घाबरला नाहीत तर पुढे जाऊन तुम्ही खूप उद्धट वागणार.' तिची साथ देत काही नेटकऱ्यांनीही संबंधित ट्रोलर्सना शिक्षा देण्याची मागणी केली आहे. 

कविताची 'एफआयआर' ही मालिका खूप गाजली. या मालिकेचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिच्यासोबत किकू शारदा, गोपिनाथ गंडोत्र, संदीप आनंद, मेलिसा आणि सपना महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. कविता 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोमध्येही झळकली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT