मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन यांचे फक्त देशभरातच नव्हे तर जगभरात करोडो चाहते आहेत. बिग बी यांची बोलण्याची, चालण्याची, अभिनयाची स्टाईल तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबरीने त्यांच्या या स्टाईलचे असंख्य दिवाने आहेत. बिग बी म्हटलं की सगळं काही कसं एकदम परफेक्ट असणारच. वयाची पंचाहत्तरी ओलांडल्यानंतरही बिग बी अगदी नव्या जोमाने काम करतात. छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' या शोचे नाव कानी पडताच अमिताभ यांचाच चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो. आता याच शोसंदर्भात प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. सोनी टीव्ही वाहिनीवरील 'कौन बनेगा करोडपती'च्या 12व्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. अमिताभ यांनी एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली. अमिताभ यांनी घरातूनच हा व्हिडिओ शूट केला आहे.
तसेच सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन 'केबीसी'च्या नव्या पर्वाची घोषणा केली आहे. 'केबीसी'चं हे नवं पर्व इतर पर्वांपेक्षा काहीसं वेगळं असणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या शोसाठी रजिस्ट्रेशनपासून ते स्पर्धकांच्या निवडीपर्यंत सारं काही ऑनलाईन होणार आहे. 'केबीसी'च्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदाच घडत आहे.
तसेच या शोची टॅगलाईन विशेष लक्ष वेधून घेणारी आहे. `हर चीज को ब्रेक लग सकता है...सपनों को नहीं` हे बिग बींच्या तोंडून ऐकायला मिळालेलं वाक्य खरंच खूप काही सांगून जात आहे. येत्या 9 मेला रात्री 9 वाजल्यापासून 'केबीसी'साठी रजिस्ट्रेशन सुरु होणार आहे. यामध्ये रात्री 9 वाजता बिग बी सोनी टीव्ही वाहिनीवर एक प्रश्न विचारतील. या प्रश्नाचे उत्तर एसएसएसद्वारे किंवा सोनी लिव्ह अॅप द्वारे स्पर्धकांना द्यायचे आहे. त्यानंतर अचूक उत्तर देणाऱ्यांची निवड होईल आणि त्यांना फोनवरुन संपर्क साधण्यात येणार आहे. त्यानंतर सोनी लिव्ह अॅपद्वारेचे स्पर्धकांची सामान्य ज्ञान चाचणी होईल. आणि या प्रोसेसच्या शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धकांची मुलाखत घेतली जाईल.
ही संपूर्ण प्रक्रिया खूप मोठी असली तरी ऑनलाईन हे सारं काम केलं जाणार आहे. 'केबीसी'चे रजिस्ट्रेशन आणि त्यानंतरची सारी प्रोसेस धरुन शो सुरु व्हायला बराच वेळ लागतो. रजिस्ट्रेशन, स्क्रिनिंग, ऑनलाईन ऑडिशन, मुलाखत असे चार टप्पे स्पर्धकांना पार करावे लागतात. एकूणच काय तर अमिताभ यांचा हा सुप्रसिद्ध शो प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे.
kbc 12 amitabh bachchan announce start of registrations
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.