big b kbc 
मनोरंजन

अमिताभ बच्चन यांच्या विनंतीवर स्पर्धकाने केला केबीसीच्या प्रसिद्ध ट्युनवर कथ्थक डान्स

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन सध्या 'कौन बनेगा करोडपती'च्या १२ सिझनच्या शुटींगमध्ये बिझी आहेत. नुकताच त्यांनी या शोचा दिवाली स्पेशल एपिसोड शूट केला. यावेळी बिग बी वेगळ्याच अंदाजात दिसून आले. दिवाली स्पेशल एपिसोडमध्ये बिग बींनी फॉर्मल्सच्या ऐवजी कुर्ता पायजामा असा पारंपारिक पेहराव केला होता. त्यांनी स्वतःचा त्यांचा फोटो शेअर करत या लूकची एक झलक चाहत्यांना दाखवली होती. शुक्रवारच्या एपिसोडची सुरुवातंच बिग बींनी एका सुंदर कवितेने केली.

'केबीसी'च्या या एपिसोडची सुरुवात वडोदरा येथून आलेल्या शर्मिला गार्गायनने हॉट सीटवर बसून केली. पाच हजार रुपयाच्या प्रश्नापासून याची सुरुवात झाली. हा प्रश्न नृत्यकलेशी संबंधित होता. हा प्रश्न ऐकल्यानंतर शर्मिलाने बिग बींना सांगितलं की ती हा नृत्य प्रकार शिकली आहे. इतकंच नाही तर याविषयी अधिक सांगताना ती म्हणाली की तिने संगीतात एम ए केलं आहे. हे ऐकून बिग बींना आनंद झाला. 

शर्मिलाने जसं तिच्या या कलेविषयी सांगितलं तशी लगेचच बिग बींनी एक खास फर्माइश केली. यावर जेव्हा बिग बींनी म्युझिक म्हटलं तेव्हा केबीसीची प्रसिद्ध थीम म्युझिक सुरु झाली. केबीसीच्या थीम ट्युनवर शर्मिला गार्गायनने सुंदर कथ्थक मुद्रा सादर केल्या. हा परफॉर्मन्स बघताना बिग बींचा चेहरा खुलला होता. जसा हा परफॉर्मन्स संपला तशी बिग बींनी तिच्या कलेची स्तुती करायला सुरुवात केली. बिग बींसोबतंच प्रेक्षकांनाही हा डान्स चांगलाच भावला.  

kbc 12 contestant sharmila dances on the famous theme tune of amitabh show kbc  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT