amitabh bachchan with kbc producar 
मनोरंजन

KBC 13: ..अन् बिग बींनी अचानक निर्मात्यांना शो थांबवायला सांगितलं

नेमकं घडलं तरी काय?

स्वाती वेमूल

'कौन बनेगा करोडपती १३' या KBC 13 शोचा नवीन प्रोमो सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला. या व्हिडीओमध्ये सूत्रसंचालक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan हे निर्मात्यांना शो मध्येच थांबवण्यास सांगताना दिसत आहेत. शोमध्ये भाग घेतलेली स्पर्धक नम्रता शाह यांच्यासोबत चहा प्यायला जाण्यासाठी त्यांनी निर्मात्यांना शो थांबवण्याची विनंती केली आहे. बिग बींचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्पर्धक नम्रता या हॉटसीटवर येताच बिग बी त्यांचं कौतुक करू लागतात. मी तुम्हाला अमितजी म्हणून हाक मारू का, असं त्यांनी विचारताच, बिग बी म्हणतात, "मला अमित म्हणा." "प्रॉड्युसरजी, हा कार्यक्रम इथेच बंद करा, मला नम्रताजींसोबत बाहेर चहा प्यायला जायचं आहे", असं बिग बी पुढे म्हणतात. हे ऐकून उपस्थित प्रेक्षकसुद्धा हसू लागतात.

नम्रता यांनी यावेळी 'कलंक' चित्रपटातील 'घर मोरे परदेसियाँ' या गाण्यावर नृत्यदेखील सादर केलं. त्यांचं नृत्यकौशल्य पाहून बिग बीसुद्धा अवाक् झाले. बिग बी आणि नम्रता यांच्यातील संवाद प्रेक्षकांना आगामी एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे. याच एपिसोडमधील तिसरा स्पर्धक एक कोटी रुपये जिंकणार आहे. १४ प्रश्नांची अचूक उत्तरं देऊन हा स्पर्धक कोट्यधीश होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT