KBC 14 Juniors  Esakal
मनोरंजन

KBC 14 Juniors: "यांच्यासोबत खेळणे अशक्यचं"; बिग बी रागात हॉटसीटवरून उठले!

सकाळ डिजिटल टीम

रिअॅलिटी शो 14 चा यंदाचा सिझन चांगलाच गाजला आहे. त्यातच 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये ज्युनियर्सचा सिझन लवकरच सुरु होणार आहे. यात छोटी मुलं क्विझ गेम खेळताना दिसणार आहे. हि पहिलीच वेळ नसून वर्षानुवर्षे केबीसीच्या मंचावरील मुलं त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर लाखो आणि करोडो रुपयांची बक्षिस जिंकतात.

आता पुन्हा एकदा ही लहान मुलं आपल्या ज्ञानाच्या जोरावर संपूर्ण देशाला चकित करणार आहेत. सोनी चॅनलने KBC 14 च्या ज्युनियर स्पेशलचे प्रोमो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या व्हिडिओत मुलांचं ज्ञान पाहून होस्ट अमिताभ बच्चन यांनाही धक्का बसला.

आगामी एपिसोडमध्ये गुरुग्रामचा आदित्य श्रीवास्तव हा स्पर्धक म्हणून आलाय. आदित्य फक्त नावालाच 11 वर्षांचा आहे. त्याचं ज्ञान पाहिल्यानंतर भल्याभल्यांना धक्का लागला आहे. त्यांचे ज्ञान पाहून बिग बींनाही मोठा धक्का बसलाय आणि त्यांनी थेट स्टेज सोडला.

ताज्या प्रोमोमध्ये दिसून येते की, 11 वर्षांचा आदित्य प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अतिशय उत्तमरित्या आणि आत्मविश्वासाने देतोय. त्यांच्या उत्तराचा वेग हा प्रचंड आहे. वेळ सुरु होताच काही वेळातच तो उत्तर देतोय. त्याच अफाट ज्ञान पाहून बिग बी आश्चर्यचकित झाले. शेवटी ते म्हणतात की, "ग्याननाथ जी, त्यांला ७.५ कोटी रुपये द्या आणि जाऊ द्या."

व्हिडिओमध्ये अमिताभ बच्चन हॉटसीटवरून उठताना दिसत आहेत. यादरम्यान बिग बी म्हणतात की या स्पर्धकासोबत खेळणे अशक्य आहे. KBC रिअॅलिटी शोला प्रसारित होऊन 22 वर्षे झाली आहेत. शोमध्ये प्रत्येक वयोगटातील आणि व्यवसायातील लोक येतात आणि त्यांच्या ज्ञानाच्या जोरावर मोठी रक्कम जिंकून जातात. 5 डिसेंबर 2022 पासून ज्युनियर्सचा खेळ सुरू होत आहे. सोनी टीव्हीवर रात्री 9 वाजता हा शो प्रसारित होईल. हा शो OTT प्लॅटफॉर्म Sony Liv वर देखील प्रसारित केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FASTag Rules Change : 'फास्टॅग'चे नियम बदलणार! आता ‘या’ वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागणार

Tanya Mittal Case: तान्या मित्तलच्या अडचणीत वाढ! फसवणुकीचा गंभीर आरोप अन्...; सोशल मीडिया इन्फ्लुएंसरकडून तक्रार दाखल

Mumbai Metro: मेट्रो ३ प्रवास आता अधिक सोपा! फीडर बस सेवेचा शुभारंभ, दर किती अन् कुणाला फायदा होणार?

Latest Marathi News Live Update : हिंगोलीत विद्यार्थी व शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना

Horoscope Prediction : येत्या 10 तासांमध्ये बदलणार तीन राशींचं नशीब ! बुध आणि गुरूच्या युतीमुळे होणार अफाट श्रीमंत

SCROLL FOR NEXT