kbc 15 zakir khan recite poem about mother amitabh bachchan got emotional video viral  SAKAL
मनोरंजन

KBC 15: झाकीर खानने केबीसी च्या मंचावर ऐकवली आईला समर्पित हृदयस्पर्शी कविता, अमिताभ बच्चन यांचे डोळे पाणावले

केबीसी 15 चा प्रोमो व्हायरल होतोय

Devendra Jadhav

सध्या KBC 15 चांगलंच गाजतंय. अमिताभ बच्चन पुन्हा एकदा KBC 15 मध्ये त्यांच्या सुत्रसंचालनाने रंगत आणत आहेत. गेल्या काही दिवसांपासुन KBC 15 मध्ये अनेक स्पर्धक सहभागी होत आहेत. काही स्पर्धक करोडपती सुद्धा झालेत.

अशातच KBC 15 च्या मंचावर सुप्रसिद्ध स्टँडअप कॉमेडीअन झाकीर खान सहभागी झालाय. झाकीरने त्याच्या कवितांनी KBC 15 मध्ये चांगलाच माहोल निर्माण केलेला दिसतोय.

(kbc 15 zakir khan recite poem about mother amitabh bachchan got emotional video viral)

झाकीर खानची कविता ऐकून बच्चन साहेबांचे डोळे पाणावले

KBC 15 चा नवीन प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या व्हिडिओमध्ये, कॉमेडियन झाकीर खान अमिताभ बच्चन यांच्या विनंतीनुसार सर्व मातांना एक कविता समर्पित करताना दिसत आहे. अमितजी म्हणतात, 'तुम्ही आमच्यासाठी एक छोटासा परफॉर्मन्स केलात तर आम्हाला आनंद होईल'

यावर झाकीर म्हणतो, 'कि खोया मैं जिस भी राह, वो मंजिल पर जा खुली ...दी रुसवइयां मैंने, पर मोहब्बत मुझे मिली...और बद्दुआ ने जब-जब काटा है मेरा रास्ता...मुझसे भी पहले मेरी मां की दुआएं निकलीं।'

झाकीर खानच्या कवितेवर फॅन्स फिदा

झाकीर खान आणि अमिताभ बच्चन यांचा KBC 15 चा लेटेस्ट प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्याला पाहून झाकीरच्या चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले, 'वाह'. दुसर्‍या युजरवर कमेंट करताना त्याने लिहिले, 'लव्ह यू झाकीर भाई'. कमेंट करताना तिसऱ्या यूजरने लिहिले की, 'मला तुमच्याकडून नेहमीच खूप काही शिकायला मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar Court Gangwar History : ४२ वर्षांपूर्वीही शिवाजीनगर कोर्टाबाहेर झाला होता 'असाच' रक्तरंजित थरार! माळवदकर टोळीने घेतला होता बाळू आंदेकरचा बळी; वाचा पुण्यातील टोळीयुद्धाचा इतिहास

NIC Portal Issue : एनआयसी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि फुलंब्री तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची मदत जमा होण्यास सुरुवात

Viral Video: 'स्टॅन स्टॅन' बनून रिषभ पंतचा धमाका! न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्लबसाठी सिक्सचा पाऊस पाडत केलं अर्धशतक

Latest Marathi News Live Update: टिंगरे नगर रोडवरील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

Pune Crime : रस्त्यावरील किरकोळ वादातून तरुणाचा खून; आठ जणांना जन्मठेप

SCROLL FOR NEXT