kedar shinde 
मनोरंजन

शिक्षण पद्धतीच्या बदललेल्या निर्णयावर केदार शिंदेंची प्रतिक्रिया, 'दहावी बारावीचा तेरावा घातला आता तरी..'

दिपालीराणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा बदल झाला आहे. तब्बल ३४ वर्षांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला २९ जुलै बुधवार रोजी केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला. या नव्या धोरणानुसार शालेय आणि उच्च शालेय शिक्षणाच्या रचनेमध्ये आमुलाग्र बदल घडून आला आहे. विशेष म्हणजे यामुळे दहावी आणि बारावी हे बोर्ड रद्द झाल्याने मुलांच्या मनावरचा ताण हलका झाला आहे. या नव्या बदललेल्या शिक्षण पद्धतीच्या निर्णयावर दिग्दर्शक केदार शिंदे यांची त्यांची गमतीशीर पण डोळ्यात अंजन घालणारी प्रतिक्रिया दिली आहे. 

केंद्र सरकारने नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिल्यानंतर आता सर्वस्तरांतून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही या नव्या धोरणाचं स्वागत करत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केदार शिंदे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'दहावी बारावीचा तेरावा घातला. शिक्षण पद्धती बदलली. आनंद आहे. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परिक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो.'

शालेय शिक्षणाची रचना आता १०+२ ऐवजी ५+३+३+४ अशी करण्यात आली आहे. पहिली तीन वर्ष पूर्वप्राथमिक, त्यानंतर दोन वर्ष पहिली व दुसरी, त्यापुढील तीन वर्ष तिसरी ते पाचवी व सहावी ते आठवी आणि शेवटची ४ वर्ष नववी ते बारावी अशा १५ वर्षांमध्ये शालेय शिक्षण विभागण्यात आलं आहे.    

kedar shinde express his opinion on national education policy

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : राज्य मंडळाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावी ८ फेब्रुवारीपासून, तर दहावी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT