kedar shinde, maharashtra shaheer SAKAL
मनोरंजन

महाराष्ट्र शाहीर लवकरच रिलीज असताना Kedar Shinde वर ओढवलं मोठं संकट, पोलिसात तक्रार

केदार शिंदेंना प्रचंड दुःख झालं असून त्यांच्यावर पोलिसात तक्रार दाखल करण्याची वेळ आलीय

Devendra Jadhav

Kedar Shinde News: अभिनेता - दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्र शाहीर प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. परंतु हा महत्वाकांक्षी सिनेमा रिलीज होण्याच्या आधी केदार शिंदेंवर मोठं संकट कोसळलं आहे.

यासाठी केदार शिंदेंना प्रचंड दुःख झालं असून त्यांच्यावर पोलिसात तक्रार दाखल करण्याची वेळ आलीय. काय घडलंय नेमकं बघुया...

(Kedar Shinde is in big trouble when Maharashtra Shaheer is released soon, police complaint)

केदार शिंदे यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक झालंय. एका तरुणाने केदार शिंदेंच्या अकाउंटवर स्वतःचे फोटो आणि प्रोफाइल पिक्चर पोस्ट केलेत. केदार शिंदे यांनी केलेल्या सर्व पोस्ट यामुळे डिलीट झाल्या आहेत.

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचं रिलीज तोंडावर आलं असताना केदार शिंदे त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रमोशनसाठी विविध फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत होते. पण आता त्यांचं इंस्टाग्राम अकाउंट हॅक होऊन नंतर ते डिलीट झालंय.

सहा महिन्यात दुसऱ्यांदा हि धक्कादायक घटना घडली आहे. केदार शिंदे यांनी याविषयी रीतसर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

केदार शिंदे यांनी नवीन अकाउंट ओपन केलं असून त्यांची लेक सना शिंदे हिने याविषयी माहिती दिलीय. केदार शिंदेंच्या बाबतीत दुसऱ्यांदा हा प्रकार घडला असून त्यांनी याआधीही सर्वांना सावधान रहे सतर्क रहे असा इशारा दिला होता.

केदार शिंदे लिखित आणि दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीर या सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण काल १५ सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते करण्यात आले. शाहिरांची धगधगती जीवनगाथा महाराष्ट्र शाहीर सिनेमातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे.

अवघ्या महाराष्ट्राला ज्यांच्या शाहीरी आणि पोवाड्यांनी वेड लावलं त्या शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. सिनेमाची निर्मिती केदार शिंदे यांची पत्नी बेला शिंदे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News :...तर पुण्यात संध्याकाळी ७ पर्यंतच पेट्रोल पंप सुरु ठेऊ; पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा थेट इशारा, कारण काय?

Kolhapur Politics : संजय पाटील यड्रावकर आणि राजू शेट्टींचे पीए स्वस्तिक पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी, "तुमचा काय संबंध"; नगपरिषदेतच हाय व्होल्टेज ड्रामा

Latest Marathi Breaking News Live Update : नागपूरमध्ये काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा

Nagpur Land Survey : नवीन नागपूरसाठी जमिनीच्या संयुक्त मोजणीला सुरुवात; शेतकऱ्यांचे सहकार्य; विविध यंत्रणांचा सहभाग!

Pune Traffic : पुणेकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; चारही महामार्ग जोडणारा ४५ किमीचा 'ट्विन टनेल' भूमिगत रस्ता प्रस्तावित

SCROLL FOR NEXT