kedar shinde new movie bai pan bhaari deva release on 6 january 2023 cast sukanya mone rohini hattangadi vandana gupte dipa parab chaudhari suchitra bandekar shilpa navalkar  sakal
मनोरंजन

केदार शिंदेचा 'बाईपण भारी देवा..' या दिवशी होतोय प्रदर्शित..

अत्यंत दिग्गज अभिनेत्रींना घेऊन केलेला हा चित्रपट प्रेक्षकांना वेड लावणार यात शंका नाही.

नीलेश अडसूळ

Baipan bhari deva : प्रेक्षकांच्या मनातील भावना, आवडीनिवडी अचूक ओळखून, तुमच्याआमच्या घरातील गोष्ट अगदी सहजरित्या प्रेक्षकांसमोर मांडणारे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) एक नवीन चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचं नाव आहे 'बाई पण भारी देवा'. जागतिक महिला दिनाच्या दिवशी म्हणजे ८ मार्च २०२२ रोजी त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. मध्यंतरी एक पोस्टरही रिलीज केले होते. आता मात्रा त्यांनी चित्रपटाचे मोशन पोस्टर शेयर केले आहे. हे पोस्टर पाहून चित्रपट धुमाकूळ घालणार असे दिसते आहे. कारण चित्रपटाची कास्ट पाहून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला आहे. शिवाय चित्रपट प्रदर्शनाची तारीख देखील घोषित केली आहे. (kedar shinde new movie bai pan bhaari deva release on 6 january 2023 cast sukanya mone rohini hattangadi vandana gupte dipa parab chaudhari suchitra bandekar shilpa navalkar)

केदार शिंदे सध्या नवनवीन आशय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारी 'महाराष्ट्र शाहीर' या त्यांच्या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली. याशिवाय त्यांचा 'जत्रा २' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार आहे. अशातच त्यांनी आणखी एका चित्रपटाबाबत त्यांनी पोस्ट शेयर केली आहे. त्यांचा 'बाई पण भारी देवा' हा चित्रपट आता लवकरच प्रदर्शित होणार आहे. नव्या वर्षात म्हणजे ६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

केदार शिंदे यांनी शेयर केलेल्या पोस्टर मध्ये ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, सूचित्रा बांदेकर, वंदना गुप्ते, शिल्पा नवळकर, दीपा परब- चौधरी या दिग्गज अभिनेत्री दिसत आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्कंठा चांगलीच वाढली आहे. या पोस्टमध्ये केदार शिंदे म्हणतात, 'करूया नवीन वर्षाची आनंददायी सुरूवात, जिओ स्टुडिओजची नववर्षाची खास भेट! प्रत्येक मैत्रिणीला नक्की सांगा, आपला सिनेमा येतोय! केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा' ६ जानेवारी २०२३ ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात!' असे कॅप्शन दिले आहे.

'जिओ स्टुडिओज' आणि 'एमव्हीबी मीडिया' यांची निर्मिती असलेला हा पहिलाच आहे. 'एमव्हीबी' ची ही पाहिलीच निर्मिती असून माधुरी भोसले निर्मात्या आहेत. तर बेला शिंदे आणि अजित भुरे यांचा सह-निर्माते म्हणून सहभाग लाभला आहे. आपल्या आजुबाजुला घडणाऱ्या, एखाद्या संवेदनशील घटनेविषयी, सामान्य माणसाच्या प्रश्नाविषयी मात्र अगदी हलक्याफुलक्या पध्दतीने त्याची मांडणी करण्याची ताकद केदार शिंदे यांच्या चित्रपटात असते. 'बाई पण भारी देवा'च्या निमित्ताने केदार शिंदे काय नवीन घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण तुमच्या आमच्या आयुष्यातील आई, बहिणी, बायको, मैत्रीण अशा अनेक स्त्रिया या चित्रपटात असणार आहेत एवढं ,मात्र नक्की.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: असं कसं झालं? सोन्या-चांदीचे भाव एवढे का घसरले? जाणून घ्या नवे दर

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगरात बोगस मतदार, आमदार चंद्रकांत पाटील यांचा संताप

बापरे! एवढं मोठं मंगळसूत्र... अखेर शंभूराजची झाली प्राजक्ता; कन्यादानावेळी नवरीबाईला कोसळलं रडू; रॉयल लूकवर चाहते फिदा

AI Revolution in Fetal Medicine: फीटल मेडिसिनमध्ये एआयची क्रांतिकारी कमाल; आता गर्भातील बाळावरही उपचार शक्य

Mumbai News: ३ दिवसांत स्पष्टीकरण नाही तर काम थांबवणार! बुलेट ट्रेन प्रकल्पावर संकट; दोन कंत्राटदारांना महापालिकेची नोटीस, कारण...

SCROLL FOR NEXT