ankush chaudhari AS shahir sable  sakal
मनोरंजन

अंकुश चौधरीने कसे साकारले शाहीर साबळे.. खास व्हिडीओ समोर..

'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात अंकुश चौधरी याने शाहीर साबळे यांची भूमिका साकारण्याआधी केलेल्या या फर्स्ट लुकचा व्हिडीओ..

नीलेश अडसूळ

Maharashtra shahir movie : शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे (shahir sable) म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे. शाहीर साबळे यांच्या गाण्यांवर महाराष्ट्रानेच नाही तर जगाने प्रेम केलं. त्यांचं महाराष्ट्र गीत असो, खंडोबाचा जागर किंवा कोळी गीत.. प्रत्येकच गाणं हे माणसाच्या काळजात हात घालणारं. शाहीर साबळे यांनी महाराष्ट्राला दिलेली 'महाराष्ट्राची लोकधारा' आजही अनेकांच्या स्मरणात आहे. शाहीर साबळे यांच्या पश्चात हा वारसा त्यांचा नातू म्हणजेच दिग्दर्शक केदार शिंदे पुढे नेत आहेत आणि आता तर शाहीर साबळे यांच्या जीवनावर ते चित्रपट करत आहेत. (Maharashtra Shahir Movie Updates) पुढच्या वर्षी म्हणजे २८ एप्रिल २०२३ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपट अभिनेता अंकुश चौधरी आपल्याला शाहीर साबळे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पण अंकुशचा हा खास लुक कसा तयार करण्यात आला त्याचा एक व्हिडीओ दिग्दर्शक केदार शिंदे यांनी शेअर केला आहे. (kedar shinde shared makeup video of ankush chaudhari)

अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारणार ही बातमी जेवहा जामोर आली तेव्हा अनेक शंका उपस्थित केल्या गेल्या. कारण अंकुशने आजवर केवळ डॅशिंग भूमिका साकारल्या आहेत. ही भूमिका अंकुश कशी पेलणार, तो शाहीर साबळेंसारखा कसा दिसणार याबाबत अनेक चर्चा सुरु होत्या. पण चित्रपटाचे पहिले पोस्टर समोर आले या चर्चांना पूर्णविराम मिळाला. पण अंकुश चौधरी शाहीर साबळे यांच्यासारखा दिसण्याकरता नेमकी काय मेहनत घेतली आहे. हे सांगणारा हा व्हिडीओ आहे.

या व्हिडिओला एक कॅप्शन देत केदार शिंदे म्हणतात, 'चरित्रपट बनवताना कलाकाराने त्या व्यक्तीसारखं दिसणं खूप महत्त्वाचं असतं, ज्याच्या आयुष्यावर सिनेमा बनतोय. अंकुशला शाहिरांसारखं दाखवण्यासाठी विक्रम गायकवाडांची संपूर्ण टीम, त्यातही महत्त्वाचं म्हणजे जगदीश येरे यांनी खूप मेहनत घेतली. युगेशा ओमकारने वेशभूषेची बाजू सांभाळली. पण या सगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट होती शाहिरांचा आत्मा अंकुशमध्ये आणि त्या पोस्टरवरच्या एका फोटोमध्ये उतरवणं. मेकअप, वेशभूषा हुबेहूब होऊ शकते पण जोवर कलाकाराला त्या भूमिकेचा आत्मा सापडत नाही तोवर योग्य परिणाम साधता येत नाही. हा परिणाम पोस्टरमधे साधण्यासाठी केलेले पडद्यामागचे प्रयत्न आज शेअर करतोय.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT