Kedar Shinde shared post for wife bela shinde on her 50th birthday sakal
मनोरंजन

Kedar Shinde: यापुढे तीच्या ओटीत.. केदार शिंदे यांची बायकोसाठी खास पोस्ट..

ती माझं सर्वस्व.. केदार शिंदे यांची बायकोसाठी भावूक पोस्ट..

नीलेश अडसूळ

kedar shinde: दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) म्हणजे मराठी रंगभूमीवरील एक दिग्गज व्यक्तीमत्त्व. नाटक, मालिका,. चित्रपट सर्वच स्तरावर त्यांचे भरीव योगदान आहे. सध्या त्यांची बरीच चर्चा आहे, कारण 'बाईपण देगा देवा' आणि 'महाराष्ट्र शाहीर' असे त्यांचे लोक दमदार चित्रपट लककरच प्रदर्शित होणार आहे. शिवाय ते सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असतात. अनेक चाहते त्यांची पोस्ट वाचण्यासाठी कायमच उत्सुक असतात. आज त्यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे, ती त्यांच्या बायकोसाठी म्हणजे बेला शिंदे यांच्यासाठी.. अर्थात तसे आज निमित्तही खास आहे..

(Kedar Shinde shared post for wife bela shinde on her 50th birthday)

केदार शिंदे आणि बेला शिंदे हे मराठीतील एक आयडियल कपल मानले जाते. केदार शिंदे यांनी प्रचंड संघर्ष करून हे यश मिळवलं आहे.पण या संघर्षात त्यांना साथ मिळाली ते बेला शिंदे यांची. दोघेही कॉलेज लाइफ पासून एकत्र आहेत. गेल्या वर्षीच त्यांच्या लग्नाला 25वर्षे पूर्ण झाली. या सहजीवनात त्यांनी अनेक चढ उतार पाहिले पण सोबत सोडली नाही. त्यामुळे बेला यांच्याविषयी केदार कायमच भरभरून बोलतात. आज बेला शिंदे यांचा 50 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने केदार शिंदे व्यक्त झाले आहेत.

या पोस्ट मध्ये केदार यांनी लिहिलं आहे की, 'वाढदिवस आज जीचा आहे ती.. माझं सर्वस्व आहे. आयुष्यातले अनेक चढउतार तीच्या सोबत मी अनुभवले आणि अनुभवतोय. मी नाटक सिरीयल सिनेमा या तीनही क्षेत्रात जे काम करू शकलो ते तीच्या भक्कम पाठिंबा असल्यानेच. कारण एका ठिकाणी स्थीरावण्याच्या आत मी दुसऱ्या मिडीयम मध्ये उडी मारली. पण तीने कधी हू का चू केलं नाही.'

पुढे ते म्हणाले, 'पैसा येतो आणि तोही स्थीरावण्याआधी त्याला सतरा पारंब्या फुटतात. पण ही मात्र नेटाने पाठीशी. ही आणि स्वामी नसते तर मी नक्कीच नसतो. २०२३ ५०वर्षाची झाली.. तुमच्या साक्षीने वचन देतो.. आता यापुढे तीच्या ओटीत खुप काही पडेल असंच काम करणार. श्री स्वामी समर्थ' अशा शब्दात ते व्यक्त झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

SCROLL FOR NEXT