kedar shinde wishes vandana gupte happy birthday from baipan bhaari deva SAKAL
मनोरंजन

Baipan Bhaari Deva: ही तर आमची.. केदार शिंदेंनी बाईपण भारी देवा मधील शशीला दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

बाईपण भारी देवा सिनेमातील म्हणजेत अभिनेत्री वंदना गुप्तेंचा आज वाढदिवस आहे

Devendra Jadhav

Kedar Shinde Birthday Wishes to Vandana Gupte: केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा सिनेमा अजुनही सिनेमागृहांमध्ये ठाण मांडून आहे.

कसं असतं ना, पावसाळी वातावरणात सिनेमा पहायला लोकं थिएटरमध्ये जाणं टाळतात. याचा फटका सिनेमाच्या कलेक्शनवर बसतो.

पण बाईपण भारी देवा सिनेमाच्या बाबतीत नेमकं उलटं झालं. बाईपण भारी देवा पहायला मुसळधार पावसात प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली आणि सिनेमाने सुद्धा रेकॉर्डब्रेक कमाई केली.

बाईपण भारी देवा सिनेमातील म्हणजेत अभिनेत्री वंदना गुप्तेंचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदेंनी वंदनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

(kedar shinde wishes vandana gupte happy birthday from baipan bhaari deva)

केदारने दोन शब्दात वंदना गुप्तेंना दिल्या शुभेच्छा

दिग्दर्शक केदार शिंदेंनी बाईपण भारी देवा मधील शशी म्हणजेच अभिनेत्री वंदना गुप्तेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. शुभेच्छा देताना केदार शिंदेंनी दोन शब्द वापरलेत.

केदार यांनी वंदना गुप्तेंचा एक खास फोटो पोस्ट केलाय. या फोटोत वंदना गुप्ते बुलेटवर स्टायलिस्ट अंदाजात पोझ देऊन बसल्या आहेत. हा फोटो पोस्ट करुन केदार शिंदे लिहीतात.. Happy Birthday My Don अशा हटके अंदाजात डॉन म्हणत केदार शिंदेंनी वंदना गुप्तेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात

बाईपण भारी देवा बॉक्स ऑफीस

सध्या बाईपण भारी देवा महिलांच्या या टोळीने बॉक्स ऑफिसवर राडा घातलाय. केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण बारी देवा’ हा सिनेमा 30 जूनला प्रदर्शित झालाय.

या चित्रपटाला प्रेक्षकांना अपेक्षेपेक्षाही जास्त प्रेम दिलं आहे. रिलिजच्या तीन आठवड्यानंतरही या सिनेमाला प्रेक्षकांची भरपुर गर्दी आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटांने तब्बल ३७ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.

बाईपण भारी देवा

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित आहे.

रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब यांच्या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक कलाकार आणि प्रेक्षक या चित्रपटावर प्रतिक्रिया देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

Crime News : तरुणाने आई-वडिल अन् भावाची केली हत्या; मित्राला म्हणाला- अख्खं कुटुंबच संपवलं, आता इथून पुढे...

SCROLL FOR NEXT