Ketaki Chitale Comment On NCP Sharad Pawar  esakal
मनोरंजन

केतकी चितळे मनोरुग्ण, तिला येतो झटका किशोरी पेडणेकर संतापल्या

मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या केतकी चितळेच्या अडणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ

युगंधर ताजणे

Ketaki Chitale: मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री अशी ओळख असणाऱ्या केतकी चितळेच्या अडणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर (Tv entertainment) सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह वक्तव्य करणं केतकीला भोवलं आहे. यापूर्वी देखील ती तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. तिनं शेयर केलेल्या पोस्टमुळे मोठ्या प्रमाणात चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. तिच्या त्या पोस्टचा अनेक (Sharad Pawar) राजकीय व्यक्तींनी निषेध केला आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यावर अतिशय हीन शब्दांत टीका केल्यानं तिच्यावर अनेकांनी कडाडून टीका केली आहे. यात मुंबईच्या माजी महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केतकीवर हल्लाबोल केली आहे.

किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केतकीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला त्या मुलीबद्दल काही बोलायचं नाही. ती मनोरुग्ण आहे. त्याचे ती धडे घेत आहे. तिला मधुनच झटका येतो. त्या झटक्यात काही झालं असेल त्यामुळे तिनं अशाप्रकारची प्रतिक्रिया दिली असेल. त्यामुळे तिच्यावर टीका होतेय. केतकी चितळेनं यापूर्वी देखील अशाप्रकारच्या पोस्ट करुन अनेकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे.नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार केतकीला 18 मेपर्यत कोठडी सुनावली आहे. केतकी चितळे हीने फेसबूकवर केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या घटनेवर भाष्य करताना ते म्हणाले, ''बोलण्याआधी प्रत्येकाने भान ठेवावे. खालच्या पातळीवर जाण्याची महाराष्ट्राला कधीही गरज नव्हती. आपला महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. पवारांबाबत जे काही लिहल बोललं ती विकृती आहे. त्यामुळे चांगल्या दवाखन्यात नेऊन केतकीवर उपचार करायला हवेत.'' असा सल्ला अजित पवारांनी यावेळी दिला.

केतकी चितळेची काय होती पोस्ट?

केतकीने केलेल्या पोस्टमध्ये "ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक" असे शब्द वापरण्यात आले आहेत, या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका स्विकारली आहे. यानंतर या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून, केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT