Ketaki Chitale FB Post on adipurush says Shri Ravana was a Shiva devout Brahmin who built  Somnath temple rak94
Ketaki Chitale FB Post on adipurush says Shri Ravana was a Shiva devout Brahmin who built Somnath temple rak94 
मनोरंजन

Ketaki Chitale on Adipurush : केतकीकडून रावणाचा 'श्री रावण' असा उल्लेख; नव्या वादाला तोंड फोडलं!

रोहित कणसे

मराठमोळ्या ओम राऊत यांनी दिग्दर्शित केलेला आदिपुरुष हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन आणि सैफ अली खान यांच्या मुख्य भुमिका असलेला हा चित्रपट काही दिवसांपासून चर्चेत आहे. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर यातील संवादांमुळे या चित्रपटावर सोशल मीडियातून प्रचंड टीका केली जात आहे. यादरम्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेने चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

केतकी तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. केतकीने आदिपुरूष चित्रपटाबद्दल पोस्ट लिहीली असून यामध्ये तिने रावणाचा श्री रावण असा उल्लेख केला आहे. तसेच मी चित्रपट बघितलेला नाही त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण ज्या चित्रपटाच्या टिझर मध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर मी तो चित्रपट बघणारही नाही, असं म्हटलं आहे.

आदिपुरुष चित्रपटावर केतकीची पोस्ट

फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये केतकी चितळेने लिहीलं की, "बऱ्याच लोकांनी मला विचारले की माझे आदिपुरुष या सिनेमा विषयी काय मत आहे. माझे मत: मी बघितलेला नाही त्यामुळे मी त्यावर बोलू शकत नाही. पण ज्या चित्रपटाच्या टिझर मध्ये शिवभक्त रावण रुद्राक्ष तोडणार असेल तर मी तो चित्रपट बघणारही नाही."

"रावण एक शिवभक्त ब्राह्मण होते ज्यांनी सौराष्ट्रातील सोमनाथ मंदीर बांधले होते. सोमनाथ मंदीर अनेक वेळा पडले आहे आणि बऱ्याच राजांनी आणि एका राणीने ते पुन्हा बांधले आहे. त्यापैकी एक श्री रावणही आहेत. रामायण हा घडलेला इतिहास आहे, फिरंगांनी ठरवलेले मिथ्य नाही. पुरावे आहेत रामायणाचे. नवी पिढी मूर्ख नाही की जे त्यांच्या नावावर बिल फाडून सारवासारव करणे चालू शकेल." दरम्यान केतकीच्या या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान आदिपुरूष चित्रपटातील काही डायलॉगसाठी वापरण्यात आलेल्या भाषेवरून जोरदार टीका होत आहे. चित्रपटातील वाईट व्हिएफएक्स आणि संवादावर आक्षेप घेण्यात आले आहेत. चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर शुक्ला यांच्यावर हनुमान यांच्या संवादावरुन टिकेची झोड उठवली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar : ज्या मोबाईलवरुन EVM अनलॉक केलं, तोच मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याला दिला; धक्कादायक प्रकार उघड

Latest Marathi News Live Update : तुर्भे एमआयडीसी परिसरात पाण्यात बुडून 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Narendra Modi: जॉर्जिया मेलोनी आणि नरेंद्र मोदींच्या व्हिडीओवर कंगनानं दिली प्रतिक्रिया; म्हणाली, "मोदीजींचा सर्वात चांगला गुण म्हणजे ते..."

Akola News : उद्योजकांची पिळवणूक थांबवावी;एमआयडीसी प्लॉट ओनर असोसिएशनची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Whatsapp Ban : या सहा देशांनी घातलीये व्हॉट्सॲपवर बंदी; चुकून वापरलं तर थेट जेल,जाणून घ्या का आहे अशी जबरदस्ती

SCROLL FOR NEXT