KGF 3 Rocky Fame Yash Now makers viral tweet social  sakal
मनोरंजन

KGF 3 चं वादळ पुन्हा घोंघावणार, तिसऱ्या भागात रॉकी...

केजीएफच्या चॅप्टर २ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

KGF 3 Rocky Fame Yash Now makers viral tweet social : चित्रपट विश्वामध्ये ज्या चित्रपटानं वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले होते त्या केजीएफच्या लोकप्रियतेच्या वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या आहेत. या चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. यशची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची प्रतिक्षा प्रेक्षकांना आहे.

केजीएफच्या चॅप्टर २ ला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं विक्रमी कमाई केल्याचे दिसून आले. त्यात कन्नड चित्रपटसृष्टीतील यश, श्रीनिधी शेट्टीनं प्रमुख भूमिका साकारली होती. लहानपणाचा रॉकी, त्याचे बालपण, त्याची गरीबी, त्याचा संघर्ष आणि कोलारच्या खाणीपर्यतची त्याची इंट्री हे सारं पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं आहे.

Also Read - Silicon Bank दिवाळखोरीः भारतावर नाही होणार दीर्घकालिन परिणाम...का ते वाचा!

दुसऱ्या पार्टमध्ये रॉकीला त्यानं आईला दिलेल्या वचनाची आठवण असणं, या जगात सगळ्यात जास्त श्रीमंत असणारा माणूस होण्याची त्याची इच्छा हे सारं प्रेक्षकांना प्रभावित करणारं होतं. यावेळी रॉकीच्या अवतीभोवती असणारी सामाजिक, राजकीय परिस्थिती या साऱ्याचे प्रतिबिंब दुसऱ्या पार्टमध्ये उमटल्याचे दिसून आले. दुसऱ्या पार्टमध्ये त्याची पत्नीचे होणारे निधन आणि रॉकीचे जहाज समुद्राच्या तळाशी जाणं हे प्रेक्षकांच्या मनाला चटका लावणारं होतं.

गेल्या काही दिवसांपासून रॉकीच्या नावाची पुन्हा चर्चा होऊ लागली आहे. रॉकी जिवंत असून आता तो वेगळ्याच शोधात असल्याचे बोलले जाऊ लागले. आणि केजीएफ ३ मध्ये त्याचा शोध पूर्ण होणार आहे. अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्विटमध्ये मेकर्सनं वेगळ्याच गोष्टीचा खुलासा केला आहे. त्यातून चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

बाकी कुणी काही का म्हणेना पण थोडयाच दिवसांत रॉकी नावाचे वादळ पुन्हा घोंगावणार असल्याची चर्चा असून यासगळ्यात प्रेक्षकांना आणि रॉकीच्या चाहत्यांना त्याची प्रचंड उत्सुकता असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT