KGF Chapter 2 BoxOffice Collection
KGF Chapter 2 BoxOffice Collection Google
मनोरंजन

KGF Chapter 2 ची बॉक्सऑफिसवर धूम; हिंदी व्हर्जनची कमाई पाहून व्हाल थक्क

प्रणाली मोरे

बॉक्स ऑफिसववर सध्या कन्नड सुरस्टार यशच्या केजीएफ चॅप्टर २(KGF Chapter 2) चं वादळ आलंय असं म्हणातायत. दोनच दिवसात सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी १०० करोड पर्यंत पोहोचलेल्या या सिनेमानं आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड तोडले आहेत असं देखील म्हणतायत. शुक्रवारी गुडफ्रायडे दिवशी सुद्धा केजीएफ ने हिंदी व्हर्जनच्या ग्राऊंडवर आपली जोरदार बॅटिंग सुरुच ठेवली. राजामौलींच्या RRR सोबत केजीएफ चॅप्टरची तुलना केली तर,केजीएफची प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी जवळजवळ २३१ करोडची तिकीटं बॉक्सऑफिसवर विकली गेली. अशाप्रकारे या कन्नड सिनेमानं बॉक्सऑफिसवर आपला जम चांगलाच बसवायला सुरुवात केली आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमात यश(Yash),रवीना टंडन आणि संजय दत्त(Sanjay Dutt) सारखे कलाकार या सिनेमात आहेत. या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर तगडी कमाई करीत मोठमोठ्या सिनेमांना मागे टाकलंय. ट्रेड अॅनलिस्टच्या म्हणण्यानुसार, केजीएफ नं पहिल्याच दिवशी ८८ करोडची नेट कमाई केली आहे आणि भारतातलं शुक्रवारचं बॉक्सऑफिस कलेक्शन जवळजवळ १०३ करोडचं होतं. वीकेन्डला या सिनेमाकडून आता मोठ्या अपेक्षा आहेत. तसंही या आठवड्यात लागून ४ सुट्ट्यांचा वीकेन्ड आल्यानं सिनेमाला फायदाच झाला आहे.

येणाऱ्या काही दिवसात केजीएफची घोडदौड अशीच सुरु राहिली तर हा सिनेमा वीकेन्डमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा ठरेल. सिनेमाकडून १७५ करोडची कमाई वीकेन्डदरम्यान होईल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत हिंदी सिनेमांमध्ये वीकेन्डमध्ये जास्त कमाई केल्याचा मान हा सलमान खानच्या सुल्तान सिनेमाकडे होता. सलमानच्या सुल्तान सिनेमानं प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी १८०.३८ करोडची कमाई केली होती.

'केजीएफ चॅप्टर २' सिनेमानं त्याच्या कन्नड व्हर्जनमध्येही पहिल्या दिवशी दमदार प्रदर्शन करीत बॉक्सऑफिस कलेक्शनचे आतापर्यंतचे रेकॉर्ड तोडले आहेत. या सिनेमाच्या कन्नड व्हर्जनमध्ये बॉक्सऑफिस कलेक्शनवर पुढच्या काही दिवसात उतार-चढाव पहायला मिळू शकतो असं बोललं जात आहे. खरंतर दक्षिणेतल्या इतर भाषांच्या व्हर्जनमध्ये केजीएफ सिनेमा चांगलं प्रदर्शन करताना दिसत आहे. तेलुगुमध्ये सर्वात अधिक प्रमाणत सिनेमा पाहिला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT