Jui Gadkari Esakal
मनोरंजन

Jui Gadkari On Khalapur Landslide: जुई गडकरीने करुन दाखवलं! इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी केली मोठी मदत

Vaishali Patil

Jui Gadkari On Khalapur Landslide: रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावात बुधवारची रात्र ही काळरात्र ठरली. मध्यरात्री गावात काळाने घाला घातला अन् अख्ख गाव दरडीखाली गाडलं गेलं. या दुर्घटनेत बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शंभरपेक्षा जास्त लोकांना वाचवण्यात आलं आहे. पण अजून अनेक जण ढिगाऱ्याखाली आहेत.

४० तासांच्या शोधकार्यानंतर काल सायंकाळपर्यंत मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ११० नागरिकांची ओळख पटली आहे. अजूनही ७० ते ८० नागरिकांचा शोध सुरु आहे. शासनाने शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

त्याचबरोबर अनेक कलाकारही मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यातच अनुराधा पौडवाल यांनी खालापूर इर्शाळवाडी पूरग्रस्त बांधवांना घर बांधुन देण्याचे वचन दिले आहे.

अभिनेत्री जुई गडकरीने पोस्ट शेयर करत या घटनेने हळहळ व्यक्त केली होती. आता तिने पुन्हा सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत तिच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. तिने पुढाकार घेत ग्रामस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

Jui Gadkari

जुई पोस्टमध्ये लिहिते की, "इर्शाळवाडीसाठी मदत पाठवायची असल्यास कृपया मला मेसेज करा. पंचे, चादरी, औषधे, कपडे, चपला, जेवण इत्यादी जीवनावश्यक वस्तू इर्शाळवाडीपर्यंत माझ्या टीमकडून पोहोचवल्या जातील"

जुईनं इर्शाळवाडीतील लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तिच्या चाहत्यांनाही तिने आवाहन केले आहे. ही मदत तिची टिम दुर्घटनाग्रस्तांपर्यंत पाठवतील. जुईच्या या प्रयत्नाचं सोशल मिडियावर सध्या कौतुक होत आहे. नेटकरी तिला मदत करण्याचे आश्वासन देत आहेत.

जुई गडकरीने सोशल मिडीयावर ती जेव्हा कुटूंबासोबत इर्शाळगडावर गेली होती तेव्हाचे फोटो शेयर करत पोस्ट लिहिली होती.

इर्शाळवाडीतील लोकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. नागरिकांच्या तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी ६० कंटेनर मागविण्यात आले आहेत. ‘सिडको’च्या माध्यमातून या नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्थानिक माहितीवरून या आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंबे वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळली आहे. ज्यात आता पर्यंत २२ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक लोक बेपत्ता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT