khatija rahman 
मनोरंजन

ए.आर. रहमानच्या लेकीचं ‘हे’ गाणं ऐकलंत का? वडिलांसोबत काम करण्याविषयी काय सांगतेय खातिजा?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या स्टारकिड्स या ना त्या कारणाने चर्चेत आहेत. यामध्ये तैमूर, आलिया भट्ट असे अनेक स्टारकिड्स नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी अशीच प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांची मुलगी खातिजा रहमान देखील तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. मात्र यावेळी खातिजा चर्चेत येण्याचं कारण खास आहे. खातिजा वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत संगीत क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज असल्याचं दिसून आलंय.

नुकतंच ए आर रहमान यांची मुलगी खातिजाने ‘फरिश्तो’ या गाण्याच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं. विशेष म्हणजे खातिजाने या गाण्यातून एक महत्वाचा संदेश दिला आहे. “हे एक ऍनिमेटेड गाणं आहे.ज्यामध्ये या लहान मुलीला जग शांत हवंय. मला माझ्या गाण्यातून एक खास संदेश सगळ्यांना द्यायचा होता. मात्र या गाण्यातून श्रोत्यांचं मनोरंजन होईल हे नक्की. संगीत हे असं माध्यम आहे ज्यातून आपण सगळ्यांपर्यंत एक खास संदेश पोहोचवू शकतो. या गाण्याच्या माध्यमातून एका ताकदीच्या स्त्रीची, महिलेची कथा मांडण्यात आली आहे”, असं खातिजा म्हणाली. तसंच वडिलांसोबत काम करण्याचा अनुभवही उत्तम असल्याचं तिने शेअर केलंय केलंय. 

खातिजा बॉलीवूडच्या लाइम लाइटपासून दूर असली तरीदेखील अनेकदा चाहत्यांमध्ये तिच्या चर्चा रंगत असतात. विशेष म्हणजे खातिजा ‘फरिश्तो’नंतर आणखी एक संदेश देणारं गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, तिचं हे नवीन गाणं कधी येणार हे अद्याप निश्चित नाहीये. 

khatija rahman daughter of ar rahman speak on animated song farishton  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT