Aishwarya Sharma Gets Injured Esakal
मनोरंजन

Aishwarya Sharma: खतरों के खिलाडीच्या सुरुवातीलाच गालबोट...! स्टंट करताना अभिनेत्रीला दुखापत...

Vaishali Patil

Aishwarya Sharma Gets Injured: 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेतुन पाखीच्या भुमिकेतुन घराघरात पोहचली. मात्र तिनं नुकताच हा शो सोडत रिअॅलिटी शो चा पर्याय निवडला आहे.

सध्या ती रोहित शेट्टीच्या 'खतरों के खिलाडी 13' या शोमध्ये दिसत आहे. ऐश्वर्या शर्मा ' खतरों के खिलाडी 13'च्या शूटिंगसाठी दक्षिण आफ्रिकेत आहे. मात्र या शोदरम्यान ऐश्वर्या शर्माला गंभीर दुखापत झाली आहे.

काही दिवसांच्या खेळानंतर, रोहित शेट्टी काही दिवसांत लोकेशनवर पोहोचल्याने आता खरा गेम सुरु झाला असल्याचं दिसत आहे.

Aishwarya Sharma Gets Injured

शोमध्ये ऐश्वर्या तिच्या को-स्टारसोबत खूप मजा मस्ती करतांना दिसत होती. मात्र आता दुर्दैवाने तिला स्टंट करताना हाताला दुखापत झाली आहे. अभिनेत्रीने एक इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली गेम दरम्यान दुखापत झालेला हात दाखवला.

स्टंट करताना ऐश्वर्या शर्माला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. तिचा हात निळा झाला आहे. सध्या हे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.

ऐश्वर्या शर्माचा हा फोटो पाहून चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तिने लवकरात लवकर बरं व्हावं अशी प्रार्थनाही ते करत आहेत.

त्याचबरोबर तिचं कौतुकही केलं आहे आणि तिला आणखी मजबुत बनत हा खेळ तिनं जिकांवा यासाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. .

ऐश्वर्या व्यतिरिक्त, KKK च्या 13 व्या सीझनमध्ये डेझी शाह, शीझान खान, अर्चना गौतम, रोहित बोस रॉय, अंजली आनंद, साउंडस मुफाकीर, शिव ठाकरे, न्यारा एम बॅनर्जी, अंजुम फकीह, रुही चतुर्वेदी आणि अरिजित तत्‍वेरी यांचा समावेश आहे.

आता हा शो टिव्हीवर कधी रिलिज होणार याची तारीख अधिकृतपणे घोषित केलेली नसली तरी, अनेक अहवाल दावा करण्यात येत आहे की खतरों के खिलाडी 17 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता कलर्सवर प्रसारित होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धी महामार्गावर दुचाकींचा धोकादायक सुसाट प्रवास; प्रवेशबंदी धाब्यावर, व्हिडिओ व्हायरल

Bullock Cart Race Accident : बैलांच्या पायात अडकला तरुण, बैलगाडीखाली चिरडले जाताना सुदैवाने बचावले; शर्यतीत दुचाकीस्वारांचा थरकाप उडवणारा अपघात

कथानकातील ढिसाळपणा पडला भारी ! ठरलं तर मगचा टीआरपी घसरला, स्टार प्रवाहची 'ही' मालिका ठरली गेमचेंजर

Horoscope : उद्या बनतोय संकष्टी लाभ योग! पुढचे तीन दिवस 'या' 3 राशींसाठी गोल्डन टाइम; पैशाची अडचण होईल दूर, अडकलेल्या कामांची पूर्ती

Satara ZP Politics : साताऱ्यात झेडपी सभापती निवडीवर राष्ट्रवादी-शिवसेनेचा बहिष्कार; शंभूराज देसाई-मकरंद पाटलांचा 'मास्टरस्ट्रोक', पण भाजपचा मार्ग झाला मोकळा

SCROLL FOR NEXT