Khatron Ke Khiladi Season 13 Aishwarya Sharma Badly Injured Dog Attacked Esakal
मनोरंजन

Khatron Ke Khiladi Season 13: 'खतरों के खिलाडी 13' मध्ये कुत्र्याचा हल्लाने अभिनेत्री जखमी!

Vaishali Patil

Aishwarya Sharma Badly Injured Dog Attacked: दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत असलेला स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो म्हणजेच खतरों के खिलाडी. यंदा या शोचा 13 वा सिझन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सिझन खुपच चर्चेत आहे. यंदा या शोमधील सर्वच स्पर्धकांनी धडाकेबाज स्टंट करत प्रेक्षकांची उत्सुकता कायम ठेवली आहेत.

मात्र या स्टंटदरम्यान अनेक वेळा स्पर्धक जखमी देखील होतात. काही दिवसांपुर्वी अर्चना गौतम आणि शिव ठाकरे जखमी झाले होते तर यावेळी टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या शर्मा ही देखील जखमी झाली आहे.

ऐश्वर्या शर्मा ही 'खतरों के खिलाडी 13' मधील एक मजबूत स्पर्धक आहे. तिने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिच्या हातावर अनेक जखमा आहेत. तिचा हात पुर्णपणे निळा पडला आहे. ऐश्वर्या शर्माची ही अवस्था कोणी केली आहे याचं उत्तरही तिने या पोस्टमध्ये दिलं आहे.

खतरों के खिलाडी 13' चा एक प्रोमो नुकताच रिलीज झाला. यामध्ये ऐश्वर्या शर्माने सेफ्टी सूट परिधान केलेला आहे. त्यात ती पुढे पळत आहे तर तिच्यामागे एक कुत्रा पळतांना दिसतो. तो तिच्यावर हल्ला करतो. हा एपिसोड जो 26 ऑगस्टला दाखवला जाईल. ऐश्वर्याने तिचे काही फोटो शेअर केले.

ऐश्वर्या शर्माने तिचे 6 फोटोंचा कोलाज शेयर केला आहे ज्यात तिच्या दोन्ही हात निळे पडले आहेत. त्याचबरोबर तिने . कुत्र्यांच्या फोटोही शेयर केला आहे. हल्ल्यामुळे हा प्रकार घडला. तिने त्याला आर्टिस्ट म्हटंल आहे.

तर कॅप्शनमध्ये लिहिले, डॉग्गो, इतके सुंदर पेंटिंग बनवल्याबद्दल धन्यवाद. तिची पोस्ट सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या तब्येतीची विचारणा केली आहे तर तिच्या नवऱ्याने देखील, 'तु तर सर्वांनाच आवडते ऐश्वर्या शर्मा' अशी मजेशीर कमेंट केली आहे.

खतरों के खिलाडी 13 चे गेल्या आठवड्यात 5 वे एलिमिनेशन झाले. यावेळी बॉलीवूड अभिनेत्री डेजी शाहला बाहेर जावे लागले. याआधी रुही चतुर्वेदी, अंजुम फकीह आणि अंजील आनंद यांना KKK 13 मधून बाहेर काढण्यात आले आहे.

शिव ठाकरे देखील शो च्या बाहेर गेला होता मात्र नो एलिमीनेशन मुळे तो वाचला आहे. हा शो दिवसेंदिवस रंजक होत आहे. आता कोण ही शो जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT