Khupte Tithe Gupte Viral Promo Video Esakal
मनोरंजन

Khupte Tithe Gupte: 'ए गप रे..' गुप्तेंच्या सिंहासनावर राज ठाकरे , पहा अजित पवारांवर कसा साधला निशाणा ?

झी मराठीवर लवकरच येत्या ४ जून पासून 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम सुरु होत आहे. या कार्यक्रमातील प्रोमो व्हिडीओ सध्या भलताच व्हायरल झाला आहे.

प्रणाली मोरे

Khupte Tithe Gupte: झी मराठीवर लवकरच येत्या ४ जून पासून 'खुपते तिथे गुप्ते' हा कार्यक्रम सुरु होत आहे. या कार्यक्रमाचा हा नवा सिझन आहे. याआधी देखील कार्यक्रमाचा निवेदक अवधुत गुप्तेनं आपल्या प्रश्नांनी आलेल्या गेस्टना की हसवलं,कधी रडवलं तर कधी भावूक होऊन अनेक खुलासे करण्यास भाग पाडलं.

त्यामुळे अर्थातच हा कार्यक्रम पुन्हा सुरु होतोय म्हटल्यावर यंदा कोण पाहुणे असणार,कसा भाग रंगणार याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होतीच. कार्यक्रम सुरु होण्याआधी हळूहळू आता त्याचे प्रोमो बाहेर पडू लागलेयत अन् वातावरण रंगताना दिसतंय. कारण यंदा राजकारणातील मोठमोठी नेतेमंडळी आलेली दिसत आहेत अन् त्यांची फटकेबाजी जोरदार खळबळ उडवताना दिसत आहे.(Khupte Tithe Gupte Raj Thackeray viral video, target Ajit Pawar)

खुपते तिथे गुप्तेच्या नव्या सिझनमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसणार याची चर्चा रंगली होतीच. त्यामुळे उत्सकुता होती ते राज ठाकरे नेमका कोणाचा क्लास घेणार आणि काय बोलणार हे जाणून घेण्याविषयी. या शो चा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात अवधूत गुप्ते राज ठाकरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची एक व्हिडीओ क्लीप दाखवतो. ज्यावरनं राज ठाकरे अजित पवारांच्या कार्यक्षमतेवरच बोट ठेवतात.

व्हिडीओत आपण पाहू शकतो की अजित पवार राज ठाकरे यांच्या पहिल्याच फटक्यात निवडूनआलेल्या १४ आमदारांनी कशी त्यांची साथ सोडली यावर टीका करत आहेत. आता हे पाहून शांत बसतील तर ते राज ठाकरे कसले. त्यांनी मग जी तोफ डागणं सुरु केलेलं दिसतंय त्यानं राजकारणात खळबळ उडणार हे निश्चित.

राज ठाकरे ती व्हिडीओ क्लीप पाहून म्हणताना दिसत आहेत की, ''आता मी खरंतर म्हणणार होतो, 'ए गप ए..', अजित पवार स्वतःच्या मुलाला नाही निवडून आणू शकले. बारामतीतून तर काकांनीही हात बाजूला केला..यांचं तरी काय होईल..''

आता हा प्रोमो पाहून तरी वाटतंय भाग जोरदार रंगणार अन् त्यानंतर पुन्हा अजित पवार वर्सेस राज ठाकरे अशी जोरदार फटकेबाजी ऐकायला मिळणार हे नक्की.

सध्या खुपत तिथे गुप्ते च्या नव्या सीझनमध्ये काय काय पहायला मिळणार याविषयी लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. राज ठाकरेंच्या या प्रोमो व्हिडीओवर लोका्ंच्या कमेंट्सचा वर्षाव पहायला मिळत आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'एकमेकांत भांडण लावण्यासाठी हा कार्यक्रम चालु केला आहे'. तर आणखी एकानं लिहिलं आहे,'अवधूत ला ही जमलेली गोष्ट आहे.. कुठे कुणाला घ्यायचं हे accurate कळतं त्याला,यंदा कहर करणार हा कार्यक्रम'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT