indu ki jawani 
मनोरंजन

सिनेमागृह सुरु होताच बॉलीवूडचा 'हा' सिनेमा होणार सर्वात पहिले रिलीज

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे जिथे देशभरात थिएटर बंद ठेवण्यात आली आहेत. या दरम्यान ओटीटीवर सिनेमे तर रिलीज केले गेले मात्र अजुनही सिनेप्रेमी थिएटर सुरु होण्याची वाट पाहत आहेत. आता सरकारने नियमावली जाहीर करत १५ ऑक्टोबरपासून  थिएटर सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र यासोबतंच सरकारने हे देखील म्हटलं आहे की एकुण क्षमतेच्या केवळ अर्धी क्षमता असेल एवढेत प्रेक्षक थिएटरमध्ये बसु शकतील. मात्र महाराष्ट्रात अजुनतरी थिएटर सुरु होण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत.

असं असलं तरी या सगळ्यात सिनेप्रेमींना पडलेला प्रश्न म्हणजे  थिएटर सुरु झाल्यानंतर सगळ्यात आधी कोणता सिनेमा रिलीज केला जाईल? पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री कियारा आडवाणीचा आगामी सिनेमा 'इंदू की जवानी' हा सिनेमा बॉलीवूडचा पहिला सिनेमा असेल जो थिएटर सुरु झाल्यावर सगळ्यात आधी रिलीज होईल. रिपोर्टमध्ये हे देखील सांगितलं गेलंय की क्रिस्टोफर नोलचा 'टेनेट' हा हॉलीवूड सिनेमा तर तमिळ सुपरस्टार विजयचा 'मास्टर' हा साऊथ सिनेमा हे पहिले सिनेमे असतील जे थिएटर पुन्हा एकदा सुरु झाल्यावर सगळ्यात आधी रिलीज होतील. 

रिपोर्टनुसार एका थिएटरच्या मालकाने सांगितलं की 'टेनेट' आणि 'मास्टर' हे दोन्ही सिनेमे रिलीजसाठी पूर्णपणे तयार आहेत. त्यांनी सांगितलं की निखिल आडवाणीने त्याचा इंदू की जवानी हा सिनेमा देखील  आत्तापर्यंत ऑनलाईनवर विकला नाहीये. त्यामुळे तो कोणत्याही कराराशी बांधिल नाहीये. तेव्हा आता अनलॉक ५ मध्ये थिएटर सुरु झाल्यानंतर हे जवळपास निश्चित होईल की 'इंदू की जवानी' हा सिनेमा पहिला बॉलीवूड सिनेमा असेल जो रिलीज केला जाईल.    

kiara advani indoo ki jawani to be the first film to release in theatres after 15th october  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बुलाती है मगर जाने का नहीं! कोल्हापुरात डीपफेक, हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंगचे नवे फंडे; यातून सुटायचंय तर बातमी तुमच्यासाठी...

Ambadas Danve: राज्याच्या डोक्यावर 9 लाख कोटींचं कर्ज, देवाभाऊंच्या 200 कोटींच्या जाहिराती, सगळं भगवान भरोसे...

ED summons : ऑनलाईन बेटिंग अ‍ॅप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा अन् सोनू सुदला ईडीचं समन्स,'या' तारखेला होणार चौकशी, अडचणी वाढणार?

Pune Crime : काल बापाने न्यायालयात एन्काउंटरची भीती केली व्यक्त, आज कृष्णा आंदेकर पोलिसांनी शरण; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

IND vs PAK: जय शाह यांचा पाकिस्तानला दणका; आशिया कपवर बहिष्काराची दिलेली धमकी, आता तोंडावर आपटण्याची वेळ

SCROLL FOR NEXT