Kiccha Sudeep's Vikrant Rona hit by piracy, full movie LEAKED online Google
मनोरंजन

95 करोडच्या विक्रांत रोना सिनेमाला रिलीजनंतर तासाभरातच मोठा फटका,जाणून घ्या

किच्चा सुदीप आणि जॅकलीन फर्नांडीस यांची मुख्य भूमिका असलेला विक्रांत रोना सिनेमा २८जुलै रोजी प्रदर्शित झाला.

प्रणाली मोरे

किच्चा सुदीप(Kiccha Sudeep) आणि जॅकलीन फर्नांडीस(Jacqueline Fernandez) यांची मुख्य भूमिका असलेला विक्रांत रोना(Vikrant Rona) सिनेमा २८जुलै रोजी प्रदर्शित झाला. अनुप भंडारी दिग्दर्शित या सिनेमात अफलातून ३ डी इफेक्ट्स आणि कमालीचे व्हिज्युअल्स पहायला मिळत आहेत. इमोशन आणि अॅक्शनचा समतोल राखलेल्या या सिनेमात किच्चा सुदीपचा जबरदस्त परफॉर्मन्स ही चाहत्यांसाठी मोठी मेजवानी म्हणावी लागेल. जेव्हापासून हा सिनेमा रिलीज झाला त्याक्षणापासून ट्वीटरवर सिनेमाचे रिव्ह्यूज पहायला मिळत आहेत. यामध्ये सगळेच सिनेमाची प्रशंसा करताना देखील दिसत आहेत. पण याच दरम्यान आता सिनेमाविषयी एक वाईट बातमी कानावर आली आहे. ती म्हणजे सिनेमाची एच डी क्वालिटी प्रिंट ऑनलाईन तामिळ रॉकर्स आणि मूवीरूल्स या साईट्सवर लीक(Leak) झाली आहे.(Kiccha Sudeep's Vikrant Rona hit by piracy, full movie LEAKED online)

सिनेमाची कथा कर्नाटकातील एका गावात घडते. जिथे एका पोलिस ऑफिसरचा मर्डर होतो. त्यानंतर इन्स्पेक्टर विक्रांत रोना या केसचा तपास सुरु करतो. तपासा दरम्यान विक्रांतला कळतं की त्याच गावात एकाच शाळेतील १६ मुलांचे एकाच पद्धतीनं खून करण्यात आले आहेत. यानंतर तो खूनी पर्यंत कसा पोहोचतो याभोवतीच सिनेमाचं कथानक फिरताना दिसतं.

तसं पाहिलं तर सिनेमाला चांगले रिव्ह्यूज मिळाले आहेत,पण अनेक ठिकाणी एकच गोष्ट बोललेली दिसून येतेय ती म्हणजे किच्चा सुदीपने सिनेमाचा प्रेझेंटर, त्याचा खास मित्र आणि अभिनेता सलमान खानची कॉपी केली आहे. माहितीसाठी सांगतो की सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी विक्रांत रोना सिनेमाची सलमान खान आणि पीवीआर सिनेमानं डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी उचलली आहे.

३डी मध्ये हा सिनेमा तब्बल पाच भाषांमध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमानं आपल्या रिलीजच्या दिवशीच सगळ्यात जास्त ओपनिंग मिळवली आहे. इंट्रेस्टिंग गोष्ट ही आहे की मक्खी आणि दबंग ३ चा स्टार किच्चा सुदीप हिंदी प्रेक्षकांचं लक्ष आपल्याकडे वळवण्यात देखील यशस्वी ठरला आहे. १० ते १५ करोडची ओपनिंग या सिनेमाला हिंदी बॉक्सऑफिसवर मिळाली आहे. पण यामध्येच सिनेमाचं ऑनलाईन लीक होणं चिंतेची बाब ठरू शकते. त्यामुळे बोललं जात आहे की ९५ करोडच्या बजेट मध्ये बनलेला हा सिनेमा ऑनलाईन लीक झाल्यामुळे बॉक्सऑफिसवर कमाई करण्यात मागे पडू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT