Kili Paul  Sakal
मनोरंजन

Viral Video: 'तू लगावे जब लिपस्टिक...' वर किली पॉलने मारले ठुमके

किली पॉल सोशल मीडियावर आपल्या जबरदस्त डान्स व्हिडिओंद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. किली पॉलला बॉलीवूडच्या गाण्यांवर डान्स करण्याची खूप आवड आहे

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडनंतर आता टांझानियाचा किली पॉल भोजपुरी गाण्यांवर आपली प्रतिभा दाखवताना दिसत आहे. किली पॉल सोशल मीडियावर आपल्या जबरदस्त डान्स व्हिडिओंद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. किली पॉलला बॉलीवूडच्या गाण्यांवर डान्स करण्याची खूप आवड आहे, मात्र आता त्याचा हा छंद भोजपुरी सिनेमापर्यंत पोहोचल्याचे दिसून येत आहे. होय, टांझानियाची किली पॉलने नुकतेच पवन सिंगच्या 'तू लगावे जब लिपस्टिक' या सुपरहिट गाण्यावर डान्स करताना दिसला.

किली पॉलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये किली पॉलच्या डान्स मूव्ह्स भोजपुरी सिनेमातील प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

भोजपुरी स्टार पवन सिंगच्या गाण्यावर व्हिडीओ बनवताना किली पॉलने कॅप्शनमध्ये लिहिले – 'अनेकांनी मला या गाण्यावर डान्स करण्याची विनंती केली होती. अशा परिस्थितीत, तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी, मी आणखी भोजपुरी गाण्यांवर रील बनवण्याचा निर्णय घेतला आहे'. किली पॉल नीमा पॉलसोबत या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर डान्स करताना त्याच्या किलर स्टाइलमध्ये भोजपुरी टचही पाहायला मिळत आहे.

केवळ चाहतेच नाही तर भोजपुरी सिनेसृष्टीतील अनेक प्रसिद्ध गायक देखील किली पॉलच्या व्हिडिओवर कमेंट करताना दिसत आहेत. पवन सिंगचे चाहते त्याला या व्हिडिओमध्ये खाली टॅग करत आहेत आणि त्याला भोजपुरी सिनेमाचा मेगास्टार म्हणत आहेत. गेल्या काही वर्षात भोजपुरी सिनेमांचा बूम पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर भोजपुरी स्टार्सच्या वाढत्या फॅन फॉलोइंगने बॉलिवूड स्टार्सनाही मागे टाकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train food vendor beat passenger Video : ‘’जेवण फार महाग आहे’’, एवढंच म्हटलं तर प्रवाशाला रेल्वेतच विक्रेत्यांनी पट्टा काढून बेदम मारलं!

Rafiq Sheikh: रविंद्र धंगेकराच्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर; रफिक शेख कोण? संपूर्ण माहिती आली समोर

Latest Marathi News Live Update : सोलापुरात एसटी बसचा भीषण अपघात

Maharashtra Fisheries : पर्ससीन, एलईडी मासेमारीची एसआयटीमार्फत चौकशी करा; पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीची मागणी!

Pune News : महापालिकेने केली इमारत पाडकामासाठी नियमावली

SCROLL FOR NEXT