Kim Sharma and Leander Paes  Instagram
मनोरंजन

किम शर्मा-लिएंडर पेसच्या ख्रिसमसची रोमँटिक सुरुवात; किसिंग फोटो केला पोस्ट

गेल्या काही महिन्यांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.

स्वाती वेमूल

२००० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्बतें' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री किम शर्माने (Kim Sharma) बॉयफ्रेंड लिएंडर पेससोबत (Leander Paes) ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची रोमँटिक सुरुवात केली आहे. गुरुवारी किमने लिएंडरसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. यातील एका फोटोमध्ये ती स्वत: कॅमेऱ्यासमोर आनंदाने पोज देताना दिसत आहे. किमने लिएंडरसोबतचा रोमँटिक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे, ज्यामध्ये दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत.

जुलै महिन्यात टेनिस स्टार लिएंडरचे किमसोबत गोव्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. गोव्यामधील रेस्टॉरंटने हे फोटो शेअर केले होते. तेव्हा हे दोघं डेट करत असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याआधीही छायाचित्रकारांनी दोघांना वांद्रयामध्ये एकत्र असताना गाठलं होतं.

लिएंडर पेस आणि किम शर्मा दोघांची यापूर्वी प्रेम प्रकरणं होती. लिएंडर रेहा पिल्लाईसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होता. तिच्यापासून त्याला एक मुलगीसुद्धा आहे. किम याआधी अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करत होती. युवराज सिंग बरोबर तिच्या प्रेमसंबंधांचीही बरीच चर्चा झाली होती. किम शर्माने २००० साली शाहरुख खानच्या 'मोहब्बते' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती फिदा आणि अन्य काही चित्रपटांमध्ये दिसली. लिएंडर पेस भारताचा प्रसिद्ध टेनिसपटू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT