Kim Sharma Bollywood actress Leander Paes tennis  esakal
मनोरंजन

Kim Sharma : किम-लिएंडरचं ब्रेक अप? 'त्या' लग्नात गेल्यावर भलत्याच चर्चेला उधाण!

किम ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफवरुन जास्त चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेस सोबत तिचे काही फोटो व्हायरल झाले होते.

सकाळ डिजिटल टीम

Kim Sharma-Leander Paes Break Up : मोहब्बते चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणाऱ्या किम शर्माच्या सौंदर्याची जादू अद्यापही प्रेक्षकांच्या मनात आहे. किम ही नेहमीच तिच्या हटके फॅशनसाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी आहे. तिनं काही दिवसांपूर्वी आपण लिएंडर पेससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगितले होते. आता मात्र त्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.

किम ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या पर्सनल लाईफवरुन जास्त चर्चेत असल्याचे दिसून आले आहे. भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेस सोबत तिचे काही फोटो व्हायरल झाले होते. त्यावरुन तिला नेटकऱ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले होते. त्यांच्या रिलेशनशिपवरुन चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. मात्र आता त्यामध्ये वाद निर्माण झाल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Also Read - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

पेस आणि किम शर्मा त्यांच्या ब्रेक अपच्या बातमीमुळे चर्चेत आल्या आहेत. इ टाईम्सनं दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही सेलिब्रेटींच्या आयुष्यात वादळ तयार केले आहे. खरं तर २८ मार्चला किम आणि पेस यांच्या रिलेशनशिपच्या दुसऱ्या अॅनिव्हर्सरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तर पेसनं देखील त्याबद्दल एक रोमँटिक पोस्ट शेयर केली होती. त्यानंतर आता व्हायरल झालेल्या त्या बातमीनं लक्ष वेधून घेतले आहे.

प्रसिद्ध झालेल्या त्या बातमीमध्ये असे म्हटले गेले आहे की, किम शर्मा ही अलाना पांडेच्या लग्नामध्ये एकटीच गेली होती. तिच्यासोबत पेस नव्हता. त्यानंतर त्यांच्या रिलेशनबाबत वेगवेगळ्या पोस्ट शेयर होताना दिसत आहे. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Sugarcane Price Protest : सांगली जिल्ह्यात ऊसदराचे आंदोलन पेटले, आमदार अतुल भोसलेंच्या कारखाना राजू शेट्टींच्या सहकाऱ्यांनी पाडला बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT