aryan khan
aryan khan  esakal
मनोरंजन

Aryan Khan Case: चार्जशीट फाईल करण्यासाठी एनसीबीला आणखी 60 दिवस

युगंधर ताजणे

Bollywood News: बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) हा काही महिन्यांपूर्वी एनसीबीच्या जाळ्यात सापडला होता. त्याच्यावर ड्रग्जचं सेवन केल्याचा आरोप करण्यात आला होता. कॉर्टेलिया क्रुझ (Social Media News) प्रकरणाबाबत शाहरुखची झोप उडाली होती. त्यावेळी बॉलीवूडला मोठा धक्का बसला होता. बॉलीवूडच्या वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी यावेळी (Bollywood Actors) शाहरुखच्या मदतीसाठी धाव घेतली होती. सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. सेशन कोर्टानं आता एनसीबीला चार्जशीट दाखल करण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत दिली आहे. आर्यन खानच्या प्रकरणाची चौकशी एनसीबीद्वारे होत आहे. याप्रकरणामुळे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे देखील चर्चेत आले होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सेशन कोर्टानं पुढील 60 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्यास सांगितले आहे. 28 मार्चला एनसीबीनं एसआयटीच्या टीमसाठी मुंबईतील सेशन कोर्टामध्ये चार्जशीटसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती. त्यानंतर कोर्टानं एनसीबीला आणखी वेळ दिला होता. एनसीबीनं कोर्टाकडे 90 दिवसांचा वेळ मागितला होता. एनसीबीचं म्हणणं आहे की, ड्रग्ज प्रकरणात अजून तपास बाकी आहे. मुख्य पंचासह किरण गोसावीचं जबाब अजुन घ्यायचा आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणेला चार्जशीट दाखल करण्यासाठी वेळ लागत आहे.

आम्ही कोर्टाकडे 90 दिवसांची मुदत मागितली होती. त्यावर कोर्टानं 60 दिवसांचा वेळ दिला आहे. 2 एप्रिलला आर्यन खानची ड्रग्ज प्रकरणातील फाईल्स जमा करण्यासाठीची 180 दिवसांची मुदत समाप्त होणार आहे. याप्रकरणात काय होणार याची अनेकांना उत्सुकता आहे. विशेष तपास यंत्रणेनं खास वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून काही महत्वाचे धागेदोरे हाती लागतील अशी अपेक्षा एनसीबीनं यावेळी व्यक्त केली आहे. दोन ऑक्टोबरला एनसीबीनं कारवाई करत आर्यन खानला अटक करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT