kiran Mane Instagram
मनोरंजन

Kiran Mane Post: 'कितीबी वेळा बसा, पन दरवेळी इमानात बसलं की..', ब्रेकिंग न्यूज देत किरण मानेंनी वेधलं लक्ष

किरण माने सोशल मीडियावर नेहमीच आपल्या पोस्ट्समुळे चर्चेत येताना दिसतात.

प्रणाली मोरे

Kiran Mane: किरण माने 'बिग बॉस 4' नंतर भलतेच फॉर्मात आले आहेत. सोशल मीडियावर ते जी पोस्ट करतात ती चर्चेत येते. किरण माने आपल्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी आपला वाढदिवस फार्महाऊसवर सेलिब्रेट केला तेव्हा तिथला एक फोटो शेअर करत आपली माणसं हा विषय घेत खूप छान भावपूर्ण पोस्ट केली होती.

मानेंचं हे एक भारी आहे..त्यांचा अभिनय काळजात घुसतोच पण त्याहीपेक्षा जास्त त्यांची लेखणी खूप बोलकी आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी विमानात खिडकीजवळ बसलेला फोटो क्लिक करत पोस्ट शेअर केली आहे.

फोटो शेअर करत त्याला दिलेल्या कॅप्शनमधनं मानेंनी ब्रेकिंग न्यूज दिली आहे. जी त्यांच्या करिअर संदर्भातील आहे. चला जाणून घेऊया..नेमकं काय म्हणालेत किरण माने..(Kiran Mane Marathi Actor bigg boss 4 fame New Marathi Movie post viral)

किरण मानेंनी नुकतीच एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी विमानात बसलेला फोटो शेअर केला आहे. विमानाच्या खिडकीच्या काचेला डोकं टेकून बाहेर निरभ्र आकाशाचा स्वच्छंद आनंद घेणाऱ्या मानेंची नजर फोटोतनं खूप काही बोलून जात आहे.

मानेंसाठी हा काही करिअरमधला पहिला विमान प्रवास नसावा पण तरिदेखील त्यांच्या नजरेत काहीतरी नवं अनुभवण्यासाठी चालल्याचा आनंद स्वच्छ दिसत आहे. मानेंनी फोटो पोस्ट करत दिलेलं कॅप्शन मात्र सध्या जास्त लक्ष वेधून घेत आहे.

किरण माने यांनी पोस्ट करत लिहिलं आहे,''कितीबी वेळा बसा, पन दरवेळी इमानात बसलं की फोटू काढाय लागतो भावा. शास्त्र असतंय ते ! नवा प्रवास... नवा सिनेमा... नवी भूमिका... ''

आता ही पोस्ट करत किरण मानेंनी नवा सिनेमा करत असल्याची चाहत्यांना ब्रेकिंग न्यूज दिली आहे. त्यांनी काम केलेला 'रावरंभा' लवकरच आपल्या भेटीस येत आहे. इतरही काही प्रोजेक्टमध्ये ते व्यस्त आहेत.

मागे सुबोध भावे सोबत शूट करतानाचा एक फोटो त्यांनी गोव्यातून पोस्ट केला होता. आता या नव्या सिनेमाविषयी मानेंनी फार काही लिहिलं नसलं तरी चाहत्यांची उत्सुकता मात्र त्यांनी चांगलीच वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT