Kiran Mane Post on Shahu Maharaj Jayanti News going to be viral on internet  SAKAL
मनोरंजन

Shahu Maharaj Jayanti: महाराज, जात पाहून नोकऱ्या देता, किरण मानेंची शाहू महाराजांविषयी पोस्ट एकदा वाचाच

बिग बॉस मराठी फेम अभिनेते किरण माने यांनी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट लिहिलीय

Devendra Jadhav

Kiran Mane Post on Shahu Maharaj Jayanti News: आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. अशातच बिग बॉस मराठी फेम अभिनेते किरण माने यांनी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त खास पोस्ट लिहिलीय. हि पोस्ट अल्पवधीत व्हायरल झालीय.

किरण माने लिहितात.. "महाराज, जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बरे नव्हे. लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजेत. ...सांगलीचे लै फेमस वकील गणपतराव अभ्यंकर एकदा राजर्षी शाहू महाराजांबरोबर रथातनं चाललेवते. बोलता-बोलता त्यांनी महाराजांना सुनावले."

(Kiran Mane Post on Shahu Maharaj Jayanti News going to be viral on internet)

किरण माने पुढे लिहितात, "...शाहू महाराज सत्तेवर येण्याआधी नोकरीतल्या सगळ्या वरच्या, महत्त्वाच्या जागा सधन उच्चवर्गीय लोकांनाच दिल्या जायच्या. महाराजांनी मात्र खालच्या-अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना मोठ्या पदाच्या नोकर्‍या द्यायला सुरूवात केली होती.

त्यावर नाराज होऊन गणपतरावांनी हा आरोप केला होता. ...महाराज गप्प बसले. काहीही बोलले नाहीत. त्यांनी आपला रथ घोड्यांच्या पागेकडे नेला. नोकराला म्हन्ले, "चंदी आन रं." त्यानं आणलेले हरभरे महाराजांनी एका जाजमावर टाकले.

त्याबरोबर हरभरे खायला सगळी घोडी पळत आली. जी दांडगी, तगडी होती, ती लहान, अशक्तांना मागं सारून पुढं घुसली. शिंगरं आन् म्हातारी मागं र्‍हायली. त्यांना खायला चंदी मिळालीच नाही.

माने पुढे लिहितात, "महाराज म्हन्ले, "बघितलंत का अभ्यंकर, जी चलाख, दांडगी आणि 'लायक' होती त्यांनीच समद्या चंदीचा फडशा पाडला. लहान, रोगी आनि अशक्त उपाशीच र्‍हायली का नाय? म्हनून मी चंदी तोबऱ्यात भरून त्यांना देतो.

तसं चारल्याशिवाय ती सशक्त हुनारंच न्हाईत... मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला, तुमच्यासारख्यांच्या बरोबरीला आनायला काय करायला पायजे? खास सवलती नको का द्यायला???"

माने पुढे सांगतात कि.. "अशा विचारांचा राजांचा राजा, लोकराजा सत्तेवर असताना गोरगरीबांना काय कमी पडणार होतं? आवो, इतिहासात कधी झाली नसंल अशी क्रांती झाली.

माझ्या शाहूच्या राज्यात उच्चवर्गीयांच्या मांडीला मांडी लावून बसून अस्पृश्य - बहुजनांतील मुलंमुली शिक्षण घ्यायला लागली ! ...फासेपारधी-मातंग-गारूडी समाजातल्या लोकांना राजदरबारी नोकर्‍या दिल्या गेल्या.

त्यांना कामधंदे सुरू करायला शाहूराजांनी खिशातले पैसे दिले ! ...जातीभेदाची कीड नष्ट करायला आंतरजातीय विवाह लावले गेले...विधवाविवाह-स्त्रियांना शिक्षण, त्यांचे सबलीकरण यावर भर दिला गेला !

माने शेवटी लिहितात.. "कोवळ्या वयाच्या भिमरावामधनं, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखं भारतरत्न घडवण्यात शाहूमहाराजांचा सिंहाचा वाटा होता ! "शाहू महाराजांची जयंती दिवाळीसारखी साजरी करा. ते सामाजिक लोकशाहीचे खरे आधारस्तंभ होते."

असे उद्गार बाबासाहेबांनी काढले, ते उगाच नाही. या देशातला समतेचा पाया भक्कम करणार्‍या महामानवाला मानाचा मुजरा !" अशाप्रकारे किरण मानेंनी शाहू महाराजांबद्दल कौतुकास्पद उद्गार काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT