kiran mane priya berde sindhutai sapkal daughter mamta emotional at the promotional event of sindhutai maazi maai  SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: म्हणुन प्रिया बेर्डे आणि सिंधुताईंची लेक ममताच्या डोळ्यात पाणी आलं, किरण मानेंनी सांगितला भावुक अनुभव

सिंधुताई माझी माई मालिकेच्या प्रमोशनमध्ये एक असा प्रसंग घडला ज्यामुळे सर्व गहिवरले

Devendra Jadhav

Sindhutai Maazi Maai Marathi Serial: कलर्स मराठीवरील सिंधुताई माझी माई मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेची उत्सुकता सध्या शिगेला आहे. सध्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी या मालिकेचं प्रमोशन सुरु आहे.

किरण माने, प्रिया बेर्डे असे अनेक लोकप्रिय कलाकार मालिकेत आहेत. सिंधुताई माझी माई मालिकेच्या प्रमोशनमध्ये एक असा प्रसंग घडला त्यामुळे सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं.

(kiran mane priya berde sindhutai sapkal daughter mamta emotional at the promotional event)

किरण मानेंनी सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत प्रिया बेर्डे आणि सिंधुताईंची लेक ममताताईंच्या डोळ्यातुन पाणी आलं. किरण माने लिहीतात, "ऐ अंधेरे, देख ले मुंह तेरा काला हो गया...'माँ' ने आंखें खोल दीं, घर में उजाला हो गया !

...आईबापाचं छत्र हरवून आयुष्यात अंधार झालेल्या अनाथ पोरापोरींना सिंधुताईंनी आपल्या मायेच्या पंखांखाली घेतलं. जोपासलं. भविष्याच्या लखलखत्या प्रकाशाची वाट दावली..."

त्या 'सन्मती बाल निकेतन'मधल्या लेकरांनी 'सिंधुताई माझी माई' या मालिकेच्या टीमसमोर काळजाला हात घालणारी एक नृत्यनाटिका सादर केली. ज्यातनं त्यांनी सिंधुताईंना तर सलाम केलाच... पण आता सिंधुताईंचा वारसा तेवढ्याच जबाबदारीनं पेलणार्‍या...

माईंइतक्याच उत्कटतेनं सगळ्यांवर मायेची उबदार सावली धरणार्‍या ममताताईंना, या मुलामुलींनी 'आईS' अशी साद घालत मिठी मारली... तेव्हा ममताताईंना अश्रू अनावर झाले... आम्हा सर्वांचे डोळेही पाणावले... तो अद्भूत क्षण ! अशी पोस्ट किरण मानेंनी लिहीली आहे.

सिंधुताई माझी माई मालिकेचा अनोखा उपक्रम

मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच प्रेक्षकांना सिंधुताईं सपकाळ यांच्यावरील चरित्रकथा बघायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिनी नेहेमीच नवनवीन, कल्पक उपक्रम राबवत असते.

यावेळी देखील या आगामी मालिकेनिमित्त “करून विद्यादान करूया सिंधुताईंचा सन्मान” हा एक विद्यादानाचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्रातील मुंबई, अकोला,औरंगाबाद, नाशिक आणि पुणे या पाच शहरांमध्ये राबविण्यात आला. या कार्यक्रमाची सांगता १० ऑगस्ट रोजी पुण्यामध्ये सन्मती बाल निकेतन येथे करण्यात आली.

कलर्स मराठीचा ट्रक महाष्ट्रातल्या अनेक गांवात फिरला. 'आपल्या घरातलं, आपण वाचलेलं किमान एक तरी पुस्तक अनाथ विद्यार्थ्यांसाठी दान करा.' असं आवाहन प्रेक्षकांना दिलं. या जगावेगळ्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT