Kiran Mane shared a video about farm's products and talks about farmers labourers workers  sakal
मनोरंजन

Kiran Mane: मी ज्या वर्गाचं प्रतिनिधीत्व करतो, तो.. किरण माने यांची 'त्या' समाजासाठी खास पोस्ट..

किरण माने यांच्या पोस्टनं चर्चेला उधाण..

नीलेश अडसूळ

kiran mane: अभिनेते किरण माने आणि चर्चा एक वेगळच समीकरण आहे. पण किरण माने असा अभिनेता आहे ज्यांनी कायमच कष्टकरी, शेतकरी आणि मागास वर्गाच्या व्यथा, समस्या मांडल्या आहेत.

बऱ्याचदा अशा कष्टकऱ्यांवर अन्याय करणाऱ्यांवरही ते सडकून टीका करत असतात. आज अशीच एक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे. एक व्हिडिओ शेयर करत त्यांनी शेतकऱ्यांप्रती मनात असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

किरण माने यांनी एक व्हिडिओ शेयर केला आहे. जो एका जाहिरातीचा आहे. किरण माने यांनी काही वर्षांपूर्वी केलेली ही शेतीसाठी लागणाऱ्या ठिबकची जाहिरात आहे. ही जुनी जाहिरात त्यांनी शेयर केली त्यामागे ही एक खास कारण आहे, कारण नुकतीच त्यांनी एक शेतीसाठी लागणाऱ्या उपयुक्त वस्तूंची जाहिरात केली असून लवकरच ती प्रदर्शित होणार आहे.

या व्हिडिओ सोबत त्यांनी एक भन्नाट कॅप्शनही दिले आहे. किरण माने म्हणतात, ''लवकरच मी तुम्हाला मिल्सन पशूखाद्याच्या ॲड फिल्ममध्ये दिसेन. त्याचं शुटिंग करताना लै लै लै वर्षांपूर्वी केलेल्या ह्या ॲडची आठवण आली ! फिनोलेक्स ठिबक. ही तुफान गाजलेली जिंगल माझ्या लै जवळची हाय. जाहिराती मोजक्याच केल्या मी, पण शेती आणि शेतकरी संबंधीत ॲडसाठी विचारलं की भारी वाटतं.''

पुढे ते म्हणतात, ''मी ज्या कुटूंबातनं वर आलो, मी ज्या वर्गाचं प्रतिनिधीत्व करतो, तो कष्टकरी-शेतकरी समाज. त्यांना 'रिलेट' करणारं काही करायला मिळणं हे मला खूप समाधान देऊन जातं.'' अशी पोस्ट किरण माने शेयर केली आहे.

किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे. बिग बॉस मराठी नंतर त्यांच्या प्रसिद्धीत मोठी वाढ झाली असून त्यांचे चाहते आता महाराष्ट्रभर पसरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai BEST Election Results : बेस्ट पतपेढी निवडणुकीत उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव, मुंबई महापालिका निवडणुकीआधीच ठाकरे बंधुंना मोठा धक्का

Mumbai Rain Update: मुंबईत तिसऱ्या दिवशीही मुसळधार, लोकल सेवेचा खोळंबा, अनेक गाड्या रद्द, चाकरमान्यांचे हाल

Shivaji Maharaj : काय होता शिवरायांचा संतुलित आहार? युद्धासाठी नेहमी तंदुरुस्त राहण्यामागचं खरं रहस्य! आजच्या पिढीसाठी प्रेरणा

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्याला झटपट बनवा चवदार ज्वारीची उकडपेंडी, सोपी आहे रेसिपी

MP Udayanraje Bhosale: उरमोडी प्रकल्प विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदील: उदयनराजे भोसले; 'जल आयोगाकडून ३०४२.६७ कोटींचा निधी मंजूर'

SCROLL FOR NEXT