kiran mane shared post about tendlya marathi movie special screening cast actor firoz shaikh sakal
मनोरंजन

Kiran Mane: माझ्या एका शब्दावर.. सगळ्या उथळ यंत्रणांना मोडीत काढत किरण माने यांनी जे केलं ते पाहून..

अभिमान वाटेल असं काम करतयात अभिनेते किरण माने..

नीलेश अडसूळ

अभिनेते किरण माने सातत्याने काहीना काही पोस्ट करत असतात. कधी सामाजिक विषयावर तर कधी वैयक्तिक अनुभवावर. कालच त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणावर मुस्लिम समाजाला होणाऱ्या विरोधावरुन सडकून टीका केली. यावेळी वारकरी संप्रदायचा दाखला देत त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला.

अशातच त्यांनी पुन्हा आज एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट आहे एका चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगची. काही दिवसांपूर्वीच किरण माने यांनी 'तेंडल्या' या चित्रपटा विषयी भरभरून लिहिले होते. या चित्रपटाचे कौतुक केले होते, त्याला चित्रपटगृह मिळत नसल्याने त्याबाबतही भाष्य केले.

पण आता किरण माने असं काही केलं आहे, की ते पाहून सगळ्यांनाच त्यांचा अभिमान वाटेल. किरण माने यांच्या एका शब्दावर 'तेंडल्या' चित्रपटाचा विशेष शो लावण्यात आला. त्याच विषयी त्यांनी आज लिहिले आहे..

(kiran mane shared post about tendlya marathi movie special screening cast actor firoz shaikh)

या पोस्ट मध्ये चित्रपट गृहतील एक विडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये किरण माने प्रेक्षकांचे आभार मानत आहेत. सोबत त्यांनी कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, "किरणजी, तुमच्या पोस्टस् पाहून मला खात्री पटलीय की 'तेंडल्या' हा उत्तम सिनेमा असणार ! आज तुमच्यासह 'तेंडल्या' पहायला मी फॅमिलीसहित येतोय...माझ्या मित्रमंडळी, स्नेह्यांनाही आमंत्रण देतोय."

''...निर्मिती ग्रुप ऑफ कंपनीज् चे सर्वेसर्वा, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी आणि माझे जवळचे मित्र हर्षल शिंदे यांचा फोन आला... शो बघता-बघता 'हाऊसफुल्ल' झाला. या शो ला 'तेंडल्या' सिनेमाचा हिरो फिरोज शेखही माझ्यावरच्या प्रेमापोटी आवर्जुन आला.''

''आपल्या एका शब्दावर, चार ओळींच्या पोस्टवर विश्वास ठेवून हर्षलजींसारखे लोक येतात, तेव्हा जबाबदारी वाढल्याचं भान येतं. 'तेंडल्या' पाहून प्रत्येकजण खुश झाला. फक्त खुश नाही, तर भारावून गेला... लोक सिनेमा पहाताना खळखळून हसत होते, टाळ्या वाजवत होते, डोळे पुसत होते... हे पाहुन मला अक्षरश: भरून पावल्यासारखं वाटत होतं. बर्‍याचजणांनी 'आम्ही पुन्हा येऊन हा सिनेमा बघणार' असंही सांगीतलं.''

''गेले अनेक दिवस काळजाला टोचणी लागली होती. पोरं गांवाकडची आहेत. पाठीशी कुणी बडी काॅर्पोरेट कंपनी नाही. सगळ्या दिग्गज यंत्रणा उथळ आणि सुमार लोकांसाठी पैसा ओतताहेत.''

''एक कलाकार म्हणून मी दुसर्‍या एका सृजनशील दिग्दर्शकाची, अभिनेत्यांची ही सर्वांगसुंदर कलाकृती प्रेक्षकांपर्यन्त पोहोचावी म्हणून माझ्या परीनं काय-काय करू शकतो? या विचारानं अस्वस्थता येत होती. असो, 'तेंडल्या'ला आपल्याकडून 'खारीचा वाटा' का होईना दिला गेला याचं आता अपार समाधान आहे...'' अशी पोस्ट किरण माने यांनी शेयर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

MP Naresh Mhaske : अर्बन नक्षल घुसखोरीवरून पुरोगामी नेत्यांची कोल्हेकुई; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

Loan Penalty: आरबीआयकडून मोठा दिलासा! आता कर्जाच्या प्री-पेमेंटवर दंड भरावा लागणार नाही, नियम कधीपासून लागू होणार?

Georai Crime : गायरान जमिन का कसता? असे म्हणून अदिवासी कुटुंबीयाना कु-हाडीने मारहाण; वडिलांसह माय-लेकी गंभीर जखमी

Latest Maharashtra News Updates : ज्वेलर्सचे सुरक्षा रक्षक भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT