Kiran Mane shared post about vidyarthi bharati ngo in sangali special session for students
Kiran Mane shared post about vidyarthi bharati ngo in sangali special session for students sakal
मनोरंजन

Kiran Mane: भटक्या विमुक्त समाजातीतील मुलांसोबत.. किरण माने यांच्या पोस्टनं सर्वांचच लक्ष वेधलं..

नीलेश अडसूळ

kiran mane: किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. कधी राजकीय जीवनावर लिहीत असतात तर कधी समाजिक जीवनावर..

आयुष्यात न पटणाऱ्या आणि खटकणाऱ्या गोष्टींवर ते सडेतोड टीका करत आले आहेत. त्यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट, नाटक केले असले तरी त्यांना गेल्या काही वर्षात खूप ओळख मिळाली आहे.

'मुलगी झाली हो' मालिकेतून बाहेर पडल्यावर त्या प्रकरणाला राजकीय रंग आला आणि किरण माने हे नाव वाऱ्यासारखं पसरलं. बिग बॉस नंतर त्यांच्या प्रसिद्धीत अधिकच भर पडली.

त्यामुळे ग्रामीण भागात त्यांची मोठी क्रेझ आहे. त्यांना रोज कितीतरी आमंत्रणं येत असतात. त्यातल्या बऱ्याच कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावतात. पण नुकतेच ते अशा ठिकाणी गेले होते, याविषयी त्यांनी भरभरून लिहिले आहे.

(Kiran Mane shared post about vidyarthi bharati ngo in sangali special session for students)

किरण माने यांनी लिहिले आहे की, 'भटक्या, विमुक्त समाजातली टीनएजर मुलंमुली...
काहीजण लहान वयातच आईवडिलांचे छत्र गमावल्यामुळं दिशाहिन झालेले... काहींनी वडिलांच्या व्यसनाधिनतेमुळे पोट भरण्यासाठी गुन्हेगारीचा मार्ग स्विकारलेला...'

'काही मुली लहान वयातच भयानक प्रसंग आल्यामुळे आयुष्य उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या...काही निसरड्या वयात अनवधानानं झालेल्या चुकीमुळे समाजाने वाळीत टाकलेल्या... '

'अंध तर काही अपंग...अशा मुलामुलींना 'विद्यार्थी भारती' संस्थेमार्फत आधार देऊन, शिक्षण देणारे.. त्यांच्यातले टॅलेन्ट, कलागुण हेरून त्यांना आयुष्यात भक्कमपणे उभं करणारे किशोर गणाई आणि त्यांच्या सहकार्‍यांविषयी खूप ऐकून होतो.'

'मागच्या आठवड्यात अचानक विद्यार्थी भारतीमधूनच फोन आला, "किरणसर, सातार्‍याजवळ आमच्या महाराष्ट्रभरातल्या मुलामुलींचे एक शिबीर भरवतोय. ब्रह्मपुरुच्या गाडगेबाबा आश्रमशाळेत. डाॅ.आ.ह. साळुंखे तात्यांच्या हस्ते उद्घाटन करतोय. शिबिराची टॅगलाईन आहे, 'डिकोडिंग - आमच्या धडावर आमचंच डोकं' ! मुलांची आणि आमचीही मनापासून इच्छा आहे की तुम्ही एक दिवस वेळ काढून सगळ्यांशी गप्पा मारायला यावं.'

'मी शुटिंगमध्ये खूपच बिझी होतो. शक्य नव्हतं खरंतर. पण मुलांना किरणसर हवेच होते. संस्थेच्या साक्षी भोईरनं अक्षरश: रोज पाठपुरावा केला. फोनवर फोन. मुलांची 'विल पाॅवर' खूपच स्ट्राॅंग असावी बहुतेक. एक दिवस सुट्टी मिळाली. गेलो गप्पा मारायला.'

'आमच्या धडावर आमचंच डोकं' ! विषय काळजाच्या जवळचा. बोलता-बोलता अक्षरश: हरवून गेलो. मुलामुलींनी खूप प्रश्न, खूप शंका विचारल्या... बुद्ध-तुकारामांपासून ते वर्तमानात भवताली घडणार्‍या घटनांबद्दल... पहिलवान मुलींचे आंदोलन, केरला स्टोरी, सांस्कृतिक वर्चस्ववाद, कलावंतांची मुस्कटदाबी, स्वत:ला घडवण्यासाठीचा संघर्ष प्रत्येक गोष्टीवर मुलामुलींना खूप काही जाणून घ्यायचं होतं...'

'त्यांना मुलगी झाली हो च्या 'विलास पाटील' या भुमिकेविषयीही ऐकायचं होतं आणि त्यानंतर झालेल्या वादांत 'किरण माने'नं घेतलेल्या भुमिकेविषयीही मला बोलतं करायचं होतं ! बिगबाॅसचा अनुभवही ऐकायचा होता, त्यानंतरचा प्रवासही जाणून घ्यायचा होता. तीन तास कमीच पडल्यासारखं वाटलं.'


'अशा गोष्टी माझ्यातल्या माणसासह अभिनेत्यालाही समृद्ध करतात भावांनो. मला लै लै लै भारी वाटतं जेव्हा अशा संस्था, अशी मुलंमुली मला 'आपला माणूस' मानतात, माझ्यावर निरपेक्ष आणि अतोनात प्रेम करतात. आजकाल कलाकारांना असं समाधान लाभणं दुर्मिळ झालंय. मी लै श्रीमंत कलावंत हाय !' अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT