Kiran Mane shared post for apurva nemlekar and akshay kelkar bigg boss finale top 3 memory occasion of ravrambha premier sakal
मनोरंजन

Kiran Mane: कट्टर हाडवैरी ते दोस्त... अपूर्वा आणि अक्षय साठी किरण माने यांची खास पोस्ट...

किरण माने यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष..

नीलेश अडसूळ

kiran mane: गेली काही दिवस किरण माने बरेच चर्चेत आहेत, सुरवातीला वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असणारे किरण माने सध्या बिग बॉस मुळे अधिक चर्चेत आले. आता मुंबईत सह ग्रामीण भागात त्यांची प्रचंड हवा आहे.

यंदाच्या बिग बॉसच्या चौथ्या पर्वात किरण माने सहभागी झाले होते. वयाच्या ५२ व्या वर्षी साताऱ्यातल्या बच्चन किरण मानेंनी जबरदस्त खेळ खेळून बिग बॉस मराठी ४ मध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली. प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळंच स्थान निर्माण केलं.

यावेळी त्यांच्यासोबत अपूर्वा नेमळेकर आणि अक्षय केळकर हे देखील टॉप ३ मध्ये होते. या खेळात या तिघांमध्ये प्रचंड जुंपलेली दिसली. चिक्कार भांडण, वाद आणि तंटे करत या तिघांनी घर डोक्यावर घेतलं होतं.

पण आज त्याच अपूर्वा आणि अक्षय साठी किरण माने यांनी एक खास पोस्ट लिहिली आहे.

(Kiran Mane shared post for apurva nemlekar and akshay kelkar bigg boss finale top 3 memory occasion of ravrambha premier)

अभिनेता किरण माने आणि अपूर्वा नेमळेकर 'रावरंभा' चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रीमियर शोच्या निमित्ताने किरण माने, अपूर्वा आणि अक्षय केळकर ही त्रयी पुन्हा एकत्र आली. यावेळी एकमेकांचे दुश्मन मानले जाणारे हे तीनजन एकमेकांना मिठी मारत भेटताना दिसले. त्याच संदर्भात किरण माने यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

किरण माने म्हणतात, ''टाॅप थ्री ! 'बिग बाॅस'च्या घरात संपूर्ण शंभर दिवस रहाणं हे आलेल्या प्रत्येकाचं स्वप्न असतं. घरातल्या सोफ्यावर बसून 'ग्रॅंड फिनाले'चा नादखुळा माहौल अनुभवणं... युक्ती आणि शक्तीचा मेळ राखून लै लै लै मेहनतीनंतर 'शेवटचा दिस गोड' करणं हे सुख फक्त तिघांच्याच वाट्याला येतं... त्यातले आम्ही 'टाॅप थ्री' फायनलिस्ट !''

पुढे किरण माने लिहितात की, ''बिगबाॅसच्या घरात आम्ही जीव खाऊन भांडलो, वाद घातले, एकमेकांविरोधात रणनित्या आखल्या, कुस्त्या खेळल्या, कधी हरलो-कधी जिंकलो. परवा 'रावरंभा'च्या प्रिमियरला मुंबईत एकत्र भेटलो तेव्हा आणखी एक लक्षात आलं...''

''फिनाले' प्रमाणेच हाडवैरी ते दोस्ती हा प्रवास खूप कमी जणांच्या वाट्याला येतो, तो आम्ही तिघांनी केला. आज मनात कुठलंच किल्मिष नाही. असेल तर निखळ मैत्रीच आहे फक्त. भेटलो तेवढ्या कमी वेळात लै धमाल केली आम्ही. खळखळून हसलो, टाळ्या दिल्या... शेवटी फोटोत मध्ये कोण उभे रहाणार यावरून अपूर्वाची जाम खेचली... मज्जा. लब्यू अक्षय आणि अप्पू '' अशा शब्दात किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बॉस माझी लाडाची' फेम आयुष संजीवची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री; सोबतीला आहे ही अभिनेत्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT