Kiran Mane shared post for TDM marathi movie and director bhaurao karhade  sakal
मनोरंजन

Kiran Mane: कुनाचा बाप तुझी घोडदौड रोखू शकनार नाय.. TDM रिलीज होताच किरण माने रोखठोक भिडले..

आज महाराष्ट्रात TDM पुन्हा प्रदर्शित होतोय, त्यानिमित्ताने किरण माने यांची पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.

नीलेश अडसूळ

Kiran Mane: आज मराठी मनोरंजन विश्वातील मोठा दिवस आहे. ज्या चित्रपटासाठी पुण्यामध्ये ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला, तो ग्रामीण माणसांचं प्रतिनिधित्व करणारा 'TDM' (टिडीएम) चित्रपट आज पुन्हा प्रदर्शित झाला आहे.

हा चित्रपट गेल्या महिन्यात 28 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. परंतु त्याच वेळी प्रदर्शित झालेल्या ',महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाचा फटका TDM ला बसला आणि थिएटर मिळत नसल्याने चित्रपट मागे घ्यावा लागला.

त्यावेळी चित्रपटाचे कलाकार, दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे अक्षरशः धायमोकलून रडले होते. पण त्यावेळी त्यांनी हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करू अशी घोषणा केली. आणि अखेर आज हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

ग्रामीण भागात या चित्रपटाला तूफान प्रतिसाद मिळत असून, अभिनेते किरण माने यांनी या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे.

(Kiran Mane shared post for TDM marathi movie and director bhaurao karhade )

किरण माने यांनी लिहिले आहे की, ''...भाऊराव कर्‍हाडे, कितीबी झालं तरी तू शेतकर्‍याचा पोरगा हायेस. संकट आस्मानी असूदे नायतर सुलतानी, तू मागं नाय हटनार ! कर्ज काढून मोठ्या आशेनं स्वप्नांची पेरनी केलीवतीस. पन अचानक अवकाळीनं घात केला. बियानं कुजून गेलं. तुला लै वेदना झाल्या...''

''पुन्हा स्वत:ला सावरून तू एक पाऊल मागं घेतलंस. दुबार पेरनी करायची हिंमत दाखवलीस, इथंच आमची मनं जिंकलीस. त्यानंतर तुझा मला फोन आलावता तवाबी तुला सांगीतलंवतं, आजबी सांगतो... आता कुनाचा बाप तुझी घोडदौड रोखू शकनार नाय. लढ तू. ''

पुढे किरण माने यांनी लिहिलं आहे की, ''भुई कितीबी कठीन असली तरी ती भेदून तुझ्या सृजनाचं पिक तरारून वर येनार... खळं धान्यानं भरभरून वहानार...ग्रामीण मातीशी नाळ असलेला प्रत्येक प्रेक्षक 'टीडीएम' बघनार... तुझा पिच्चर सुप्परडुप्पर हिट्ट होनार !आज दुबार रिलीज होणार्‍या 'टीडीएम' साठी लै लै लै मनभरून शुभेच्छा, भाऊराव !'' अशा शब्दात किरण माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

'TDM'बाबत झालेलं राजकारण पाहून पुण्यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. आज अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT