kiran mane, kiran mane new movie, mahesh manjrekar SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: इच्छा अखेर पूर्ण झाली.. बिग बॉस नंतर किरण मानेंना थेट मांजरेकरांच्या सिनेमाची लॉटरी

बिग बॉस नंतर किरण माने पुढे कोणत्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार याची सर्वांना उत्सुकता होती.

Devendra Jadhav

Kiran Mane News: बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी असलेले किरण माने यांनी टॉप ३ पर्यंत मजल मारली. बिग बॉसच्या घरात सातारचा बच्चन अशी मानेंची ओळख होती. सातारा आणि आसपासच्या भागात किरण मानेंचे तमाम फॅन्स निर्माण झाले आहेत. बिग बॉस नंतर किरण माने पुढे कोणत्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेर माने यांनी स्वतः याचा उलगडा केलाय.

(kiran mane will be seen in mahesh manjrekar new movie after Bigg Boss)

किरण माने यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोत मानें सोबत अभिनेते दिग्दर्शक आणि बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर दिसत आहेत. त्यामुळे किरण माने यांना बिग बॉस नंतर थेट महेश मांजरेकर यांच्या सिनेमाची लॉटरी लागली आहे. माने यांनी सोशल मीडियावर त्यांचा आनंद शेयर केलाय.

माने लिहितात,"'वास्तव' हे हाय की, आता 'कॅमेरा' माझी आन् मी कॅमेर्‍याची पाठ सोडत नसतोय. मी येतोय भावांनो... लवकरच... एका नादखुळा भुमिकेत... वुईथ 'द महेश मांजरेकर' ! अपनी कुर्सी की पेटी बांध लीजिए.. मौसम बिगड़ने वाला है.. " अशी पोस्ट लिहून माने यांनी मनातल्या भावना शेयर केल्यात. या फोटोत पांढऱ्या शर्टात महेश मांजरेकर दिसत असून त्यांच्यामागे गॉगल लावून किरण माने उभे आहेत.

महेश मांजरेकर आणि किरण माने यांच्यात अनेक शाब्दिक वाद झाले. महेश मांजरेकरांनी चावडीवर किरण मानेंच्या चुका स्पष्ट शब्दात बोलून दाखवल्या. माने यांनाही महेश मांजरेकरांचा ओरडा ऐकावा लागला. बिग बॉस मध्ये असताना माने यांनी मांजरेरांच्या सिनेमात काम करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. आता मी मांजरेकारांसोबत काम करायला मिळाल्याने किरण माने एकदम खुश आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोशी दुर्घटना! ६० तासानंतरही ८ जणांचा शोध नाही, नातेवाईकांचा आक्रोश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा, आयुक्तांनी काय सांगितलं?

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह १५ अधिकारी निलंबित; महसूल विभागात गैरप्रकार, मंत्री बावनकुळेंची माहिती

Kaygaon News : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मुख्याध्यापकांनीच उचलला तणनाशकाचा पंप; विद्यार्थी सुरक्षा आणि आरोग्याच्या काळजीसाठी पुढाकार

Mohol News : मोहोळ येथे पंचायत समिती प्रशासन व नगरपरिषद प्रशासनात मोठा संघर्ष, नवीन नगरपरिषद इमारत बांधकामाचा पेटला वाद

Ayodhya Ram Mandir: राम मंदिर चोरीप्रकरण! काँग्रेसला अटल बिहारी वाजपेयींची आठवण; जुन्या भाषणाचा दिला दाखला

SCROLL FOR NEXT