Kiran Mane, Kiran Mane news, Kiran Mane post, kiran mane new serial SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: बिग बॉसनंतर किरण माने पुन्हा मालिकेत झळकणार, पोस्ट करून शेयर केली माहिती

सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात

Devendra Jadhav

Kiran Mane New Serial News: बिग बॉस मराठी नंतर अभिनेते किरण माने सातत्याने काहीना काही पोस्ट करत चर्चेत असतात.

किरण मानेंच्या पोस्ट हा सर्वांच्या चर्चेचा विषय असतो. किरण माने यांचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे.

अलीकडेच त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणावर मुस्लिम समाजाला होणाऱ्या विरोधावरुन सडकून टीका केली. आता किरण माने यांनी नवीन पोस्ट करून नवीन मालिकेविषयी संकेत दिलाय.

किरण माने यांनी नवीन मालिकेच्या सेटवरचे फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पोस्ट करून किरण माने लिहितात.. ..नविन मालिका, नवी भुमिका !

सहसा माझ्या वयाच्या पुरूष कलावंतांना मालिकांमध्ये फारसं काही वेगळं करायला मिळत नाही. मालिका या हिराॅईनभोवती फिरणार्‍या असतात.

अशा परिस्थितीतही मला आश्चर्यकारकरित्या लक्षवेधी कॅरॅक्टर्स साकारायला मिळाली, जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली.

किरण माने पुढे लिहितात... 'माझ्या नवर्‍याची बायको'मधला राधिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहाणारा भाऊ शिरीषदादा... 'मुलगी झाली हो' मधला तुफान गाजलेला रांगडा, हळवा, 'ॲंग्री यंग मॅन' विलास पाटील...

हे परस्परविरोधी धाटणीचे दमदार रोल्स करायला मिळणं हे माझ्यामधल्या अभिनेत्याला सुखावणारं होतं. विशेष म्हणजे दोन्ही मालिकांनी टी.आर.पी. चे रेकाॅर्डब्रेक उच्चांक गाठले होते !

किरण माने शेवटी लिहितात ...आता मी छोट्या पडद्यावर आत्तापर्यन्त साकारलेल्या भुमिकांपेक्षा खूप वेगळा माणूस साकारतोय. तुम्ही याआधी मला अशा रोलमध्ये कधी इमॅजिनही केलं नसेल !

शुटिंगला नुकतीच सुरूवात झालीय. खूप मजा येतीये. कुठल्या वाहिनीवर,कधीपासून आणि किती वाजता याबद्दल लवकरच कळवेन... तोपर्यन्त Stay Tunned !

सातारचा बच्चन म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात.

मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली.. जे जे खटकेल त्यावर निर्भीडपणे टीका करणारा आणि पटेल त्याचे तोंड भरून कौतुक करणारा अभिनेता म्हणजे किरण माने अशी त्यांची ओळख आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT