kiran mane, kiran mane news, akshay kelkar SAKAL
मनोरंजन

Kiran Mane: तुम्हीच विनर, बिग बॉसने ट्रॉफी चुकीच्या... किरण मानेंची फॅन मनातलं स्पष्टपणे म्हणाली

सातारा आणि आसपासच्या भागातील किरण मानेंचे तमाम फॅन्स त्यांना भेटण्यासाठी आतुर आहेत

Devendra Jadhav

Kiran Mane News: बिग बॉस मराठी ४ जानेवारी महिन्यात संपलं. बिग बॉस मराठी ४ मधील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. बिग बॉस मराठी ४ मध्ये सहभागी असलेले किरण माने यांनी यंदाच्या सिझनमध्ये टॉप ३ पर्यंत मजल मारली. माने मूळचे साताऱ्याचे. घरात सातारचा बच्चन अशी मानेंची ओळख होती. सातारा आणि आसपासच्या भागातील किरण मानेंचे तमाम फॅन्स त्यांना भेटण्यासाठी आतुर आहेत. अशाच एका फॅनचा किस्सा किरण मानेंच्या आयुष्यात घडला.

(Kiran Mane's fan said clearly about bigg boss marathi 4 winner)

एका फॅनच्या आग्रहास्तव किरण माने त्या फॅनला थोडावेळ का होईना भेटायला गेले. खुद्द किरण माने भेटायला आल्याने त्या फॅनचा आनंद गगनात मावेनासा झाला. फॅन म्हणाली,"तुम्ही मला भेटायला आलात माझी इच्छा पूर्ण झाली. तुम्हीच विनर होता. बिग बॉसने ट्रॉफी चुकीची दिली. तुम्हीच विनर होता. तुमच्यासारखं शांतपणे कोणी खेळलं नाही." असं म्हणत या फॅनने किरण मानेंच्या खेळाचं, त्यांच्या फॅमिलीचं, त्यांच्या हुशारीचं कौतुक केलं.

माने यांनी हा संपूर्ण अनुभव सोशल मीडियावर सांगितला आहे. माने लिहितात,"सर, मी तुमची खूप मोठी फॅन आहे. मला आत्ता समजलंय तुम्ही मोराळ्यावरून सातारला जायला निघाला आहात. रस्त्यात 'होळीचा गांव' नांवाचं छोटं गांव लागेल. तिथं मेनरोडलाच माझं छोटंसं दुकान आहे. प्लीज तुम्ही दोन मिन्टासाठी का होईना, पण तिथं या सर. मला तुम्हाला भेटायची, तुमच्याशी बोलायची खूप इच्छा आहे. प्लीज सर. नाही म्हणू नका. मी वाट पहातेय."

"वनिता खाडे यांच्या विनंतीचा मान राखून मी त्यांना भेटलो... त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि मला वेळ कमी होता म्हणून घाईघाईत माझ्याशी भरभरून बोलायची धडपड पाहून मी ही काही क्षण भारावलो. प्रेक्षकांच्या या प्रेमासाठी तर आमचा सगळा 'अट्टाहास' असतो. खूप खूप आभार वनिताजी !" अशा शब्दात माने यांनी त्यांना आलेला अनुभव शेयर केला.

अक्षय केळकर बिग बॉस मराठी ४ चा विजेता झाला. तर अपूर्वा नेमळेकर बिग बॉस मराठी ४ ची उपविजेती झाली. किरण माने टॉप ३ होते. बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर किरण माने यांचा ठिकठिकाणी सत्कार समारंभ होत आहे. किरण माने सुद्धा त्यांच्या फॅन्सना आवर्जून वेळ काढत भेटत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : इराण-अमेरिका युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकन सैन्याकडून हॉर्मुझजवळील 'बंदर अब्बास'मध्ये हवाई हल्ले

Yashvi Patel: पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर, तरीही मारली बाजी! पाहा कसं पुण्याच्या यश्वी पटेलने नागपूरच्या खेळाडूला धूळ चारली!

Gluten Free Breakfast : ग्लूटेन-फ्री आणि टेस्टी! असा बनवा चविष्ट, पोटभर आणि फिटनेस फ्रेंडली ज्वारीचा उपमा!

भारत-नायजेरिया : नेहरूंपासून मोदींपर्यंत, दोन बलाढ्य देशांचे मैत्रीचे संबंध

Ambenali Ghat Accident: ‘ही दोस्‍ती तुटायची नाही’ म्‍हणतच जगाचा निरोप; आंबेनळी घाटात जीव गमावलेले पाचही जिवलग मित्र, आसगाव झाले सुन्न ..

SCROLL FOR NEXT